युरोपमधील स्टॅबेक एफसी क्लबमधून खेळताना भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूने  ऐतिहासिक झेप घेतली. युरोपियन लीगमध्ये खेळणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडूचा मान त्याने पटकावला. टिपेलीगियान (नोविजन प्रीमिअर लीग) स्पध्रेत गुरप्रीतने स्टॅबेक एफसीला पहिल्याच लढतीत ५-० असा विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याने प्रतिस्पर्धी आय के स्टार संघाचे आक्रमण अचूकपणे परतवले.

गुरप्रीतला २०१४ मध्ये स्टॅबेक संघाने करारबद्ध केले होते. पंजाबच्या या गोलरक्षकाने या लढतीतील त्याचा अनुभव ट्विटरवरून कथन केला. ‘युरोपमधील अव्वल विभागीय लीगमध्ये खेळणारा पहिला भारतीय खेळाडू असल्याचा अभिमान वाटतो. या स्पध्रेत सातत्यपूर्ण कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल,’ असे त्याने सांगितले.