Gulbadin Naib Fake Injury: अफगाणिस्तानने बांगलादेशविरुद्ध टी-२० विश्वचषकाच्या सुपर८ मधील शेवटच्या सामन्यात विजय मिळवत इतिहास रचला आणि प्रथमच टी-२० वर्ल्डकपमधील उपांत्य फेरीत स्थान पक्के केले. या सामन्यात अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट आणि गुलबदिन नईब एका अनोख्या घटनेमुळे चर्चेत आले. एकीकडे अफगाणिस्तानचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे संघाचा अष्टपैलू खेळाडू गुलबदिन नईबवर जोरदार टीका होत आहे.
हेही वाचा – “भारताने बॉलसह…” पाकिस्तानच्या इंझमाम उल हकचा भारतीय संघावर मोठा आरोप, म्हणाले- “अर्शदीपला १५ व्या षटकात…”
अफगाणिस्तान आणि बांगलादेशच्या सामन्यात पावसाने अनेकदा व्यत्यय आणला. अनेकदा पावसामुळे सामनाही थांबला आणि अखेरीस सामन्याचे एक षटक कमी करत लक्ष्य विजयासाठई लक्ष्यही बदलले. १४व्या षटकात पाऊस पुन्हा एकदा येण्याच्या तयारीत होता. तितक्यात अफगाणिस्तानचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी खेळाडूंना सामना हळू खेळा पाऊस येणार आहे असा इशारा केला. हे पाहताच गुलबदीनने दुखापतीचे नाटक करत मैदानात बसला, त्यामुळे सामना थांबवावा लागला. गुलबदिन मैदानाबाहेर पडल्याने सामना थांबवला गेला आणि तितक्यात पावसाने हजेरी लावल्याने सामना सुरू होण्यास अजून काही वेळ लागला.
हेही वाचा – अफगाणिस्तानची प्रगती ‘याचि देही याचि डोळा’ पाहणारा मोहम्मद नबी, जागतिक क्रिकेटमधील अनोखा विक्रमवीर
गुलबदीनच्या या घटनेचा सामन्यावर फारसा परिणाम झाला नाही कारण सामन्यातून केवळ एक षटक कमी करण्यात आले आणि सुधारित लक्ष्य ११४ दिले गेले. सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर पुढच्याच षटकात गुलबदिन पुन्हा मैदानात आला आणि त्याने तंजीम हसनची विकेट घेतली. या सामन्यात समालोचन करत असलेले इयान स्मिथ म्हणाले, “माझे गुडघे गेल्या सहा महिन्यांपासून दुखत आहेत. मी सामन्यानंतर लगेच गुलबदिनच्या डॉक्टरांना भेटेन. सध्या हे डॉक्टर जगातील ८वे आश्चर्य आहेत.”
Ian Smith said, "I've a dodgy knee for the last 6 months, I am gonna see Gulbadin Naib's doctor straight after the game. He's the 8th wonder of the world right now". pic.twitter.com/zEr8gdIRQZ
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 25, 2024
माजी इंग्लिश क्रिकेटपटू मायकेल वॉनने या घटनेवर विनोदी पद्धतीने प्रतिक्रिया देत एक्सवर पोस्ट शेअर केली आणि म्हणाले, क्रिकेटचा आत्मा अजूनही जिवंत आहे आणि पुढे जात आहे. तर पुढच्या पोस्टमध्ये म्हणाले, दुखापत झाल्यानंतर अवघ्या २५ मिनिटांत विकेट घेणारा गुलबदिन इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे, हे पाहून आनंद झाला.” तर ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू ॲडम झाम्पाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आणि लिहिले, ओल्ड रेनन्स्ट्रिंग, म्हणजे पावसामुळे हॅमस्ट्रिंगची समस्या आली.