Hanuma Vihari’s AP Captaincy Reveal : एकेकाळी भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग असलेल्या हनुमा विहारीने सोशल मीडियावर एक पोस्ट करुन खळबळ उडवून दिली आहे. त्याने रणजी ट्रॉफीतील आंध्र प्रदेशचे कर्णधारपदावरुन हटवल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. हनुमा विहारीला गेल्या महिन्यात रणजी ट्रॉफीमध्ये आंध्रच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्याला हटवल्यानंतर व्हीनस रिकी भुईने संघाची कमान सांभाळली. हनुमा विहारीने आता आंध्र प्रदेशकडून कधीही खेळणार नसल्याचे सांगितले आहे. संघटनेशी त्याचे संबंध बिघडल्याचे त्याच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे.

नेत्याच्या मुलावर ओरडल्यामुळे कर्णधारपदावरुन हटवले –

हनुमा विहारीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करताना लिहले की, तो आंध्र प्रदेशसाठी कधीही क्रिकेट खेळणार नाही. कर्णधारपदावरून हटवण्याचे कारण स्पष्ट करताना, तो म्हणाला की रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यानंतर त्याला कर्णधारपदावरून जबरदस्तीने काढून टाकण्यात आले होते. हा निर्णय संघटनेचा होता. त्याने सांगितले की एका सामन्यात तो एका खेळाडूवर ओरडला होता आणि तो खेळाडू एका राजकीय नेत्याचा मुलगा होता.

Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Brad Hogg Says Parag Is eggo
IPL 2024 : ‘त्याच्यामध्ये अजूनही अहंकार आहे…’, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे रियान परागबद्दल मोठं वक्तव्य
Rohit Sharma takes over, sends Hardik Pandya to the boundary in iconic role-reversal as MI captain feels SRH's wrath
VIDEO : हैदराबादच्या ‘रन’ धुमाळीसमोर हार्दिकने पत्करली शरणागती, रोहितने मुंबईचे नेतृत्व करताना पाठवले सीमारेषेवर
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs PBKS: गुजरातला नकोसा ‘यश’, बंगळुरूसाठी मौल्यवान; कॉमेंट्रीदरम्यान कोणी केलं असं वक्तव्य?

कोणतीही चूक न नसताना कर्णधारपदावरून हटवण्यात आले –

हनुमा विहारी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आम्ही शेवटपर्यंत खूप संघर्ष केला पण हे घडणे नशिबात नव्हते. आंध्रसह आणखी एक उपांत्यपूर्व सामनागमावल्याचे दुःख आहे. ही पोस्ट मी पुढे मांडू इच्छित असलेल्या काही तथ्यांबद्दल आहे. बंगालविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मी कर्णधार होतो, त्या सामन्यादरम्यान मी १७ वर्षीय खेळाडूवर ओरडलो होतो. यानंतर त्या खेळाडूंने त्याच्या वडिलांकडे (जो राजकारणी आहे) तक्रार केली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी असोसिएशनला माझ्यावर कारवाई करण्यास सांगितले. ज्यामुळे माझी कोणतीही चूक न नसताना असोसिएशनने मला कर्णधारपदावरून हटवले.”

हेही वाचा – Hardik Pandya : आयपीएलपूर्वी हार्दिक पंड्याचे क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन, ‘या’ संघाचे करतोय नेतृत्त्व

आता आंध्रप्रदेशसाठी कधीही खेळणार नाही –

हनुमा विहारी यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “मी कधीही कोणत्याही खेळाडूला वैयक्तिकरित्या काहीही बोललो नाही, परंतु असोसिएशनला असे वाटले की गेल्या वर्षी ज्याने आपले शरीर पणाला लावले आणि डावखुरी फलंदाजी केली, त्यापेक्षा तो खेळाडू अधिक महत्त्वाचा आहे. गेल्या ७ वर्षात आंध्र प्रदेशला ५ वेळा बाद फेरीत नेले. मला खूप लाज वाटली, पण मी या हंगामात खेळणे सुरू ठेवण्याचे एकमेव कारण म्हणजे मी माझ्या संघाचा आदर करत होतो, पण आंध्रसाठी पुन्हा कधीही खेळणार नाही.”