वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज कायरन पोलार्ड याच्यासाठी १२ मे हा दिवस खास आहे. २०१८ पर्यंत हा दिवस त्याच्या साठी त्याचा वाढदिवस म्हणून खास होता, पण २०१९ पासून दोन कारणांमुळे तो दिवस त्याच्यासाठी खास झाला. त्यातील दुसरं कारण म्हणजे १२ मे २०१९ ला मुंबई इंडियन्सने चेन्नईला पराभूत अंतिम सामना जिंकला आणि सर्वाधिक चौथ्यांदा IPL विजेतेपद मिळवले. या दोन्ही गोष्टींचं औचित्य साधून मुंबई इंडियन्सने दोन ट्विट केली आहेत. एका ट्विटमध्ये पोलार्डला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी IPL विजेतेपदाचा छोटासा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

VIDEO : आजच्याच दिवशी ‘मुंबई इंडियन्स’ने मारला होता विजेतेपदाचा चौकार

“एक महान फलंदाज, साऱ्या चाहत्यांचा लाडका आणि मुंबई इंडियन्स संघाच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या पोलार्डला वाढदिवसाच्या शुभेच्छा! लवकरच भेटू”, असं ट्विट मुंबई संघाने केलं आहे.

त्याचसोबत विजेतेपदाची ट्रॉफी घेऊन धमाल करणाऱ्या मुंबईच्या खेळाडूंची व्हिडीओदेखील ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे.

“विराट म्हणजे क्रिकेटचा रॉजर फेडरर”

२०१० साली १० मे ला पोलार्डने मुंबई इंडियन्स संघातून IPL मध्ये पदार्पण केले. चॅम्पियन्स लीग टी २० स्पर्धेत पोलार्डने त्रिनिदाद आणि तोबॅगो संघाकडून खेळताना उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली होती. त्यानंतर त्याला मुंबईने संघात स्थान दिले होते.

“रन मिळाली नाही की विराट गोलंदाजाला घाणेरड्या शिव्या देतो”

पोलार्डची IPL कारकीर्द

पोलार्डने IPL मध्ये २०१० ते २०१९ दरम्यान एकूण १४८ सामन्यात मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने २८.६९ च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत २ हजार ७५५ धावा केल्या आहेत. १८१ चौकार आणि १७६ षटकारांच्या सहाय्याने त्याने ही कामगिरी केली आहे. पोलार्डला अद्याप IPL मध्ये शतक झळकावता आलेले नाही, पण त्याने १४ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या ८३ आहे. गोलंदाजीतही त्याच्या नावावर ५६ बळी आहेत. मात्र गेली दोन वर्षे त्याने मुंबईकडून गोलंदाजी केलेली नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Happy birthday kieron pollard mumbai indians wishes with special message vjb
First published on: 12-05-2020 at 14:08 IST