क्रिकेट जगतात नाव कमावल्यानंतर राजकारणात आलेले माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनी खासदारकी मिळताच मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी खासदार म्हणून मिळणारे सर्व मानधन शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करणार असल्याचे जाहीर केले आहे. १६ एप्रिल रोजी त्यांनी ट्विट करुन ही माहिती दिलीय. तसेच देशाच्या हितासाठी शक्य ते सर्वकाही करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

IPL 2022: सलग सहाव्या पराभवामुळे मुंबई इंडियन्स Playoffs आधीच स्पर्धेतून बाहेर?; पाहा Qualification चं गणित काय सांगतंय

“राज्यसभेचा खासदार म्हणून मला मिळणारे सर्व मानधन मी शेतकऱ्यांच्या मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या कल्याणासाठी देणार आहे. देशाच्या कल्याणासाठी मी राजकारणात आलो आहे. माझ्याकडून देशाच्या कल्याणासाठी जेकाही करता येईल ते सर्व करण्याचा मी प्रयत्न करणार आहे,” असे हरभजन सिंग यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा >> IPL 2022, MI vs LSG : लखनऊचा ‘सुपर’ विजय, मुंबईच्या पदरी सलग सहावा पराभव

IPL 2022, MI vs LSG : सचिनच्या बाजुला बसला अर्जुन तेंडुलकर, सामन्यातील गुरु-शिष्याचे फोटो व्हायरल

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून हरजभज सिंग यांना आप पक्षाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते असे म्हटले जात होते. त्यानंतर हरभजन सिंग नुकतेच राज्यसभेत बिनविरोध निवडून आले आहेत. हरभजन सिंग यांच्यासोबतच लव्हली प्रोफेशनल यूनिव्हर्सिटीचे संस्थापक अशोक मित्तल, आयआयटी दिल्लीचे प्रोफेसर संदीप पाठक, आपचे नेता राघव चड्ढा तसेच उद्योगपती संजीव अरोरा यांना आपने उमेदवारी दिली होती. हे सर्व उमेदवार राज्यसभेत बिनविरोध निवडून आले आहेत. याआधी आप पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीत ११७ पैकी ९२ जागांवर विजय मिळवून पंजाबमध्ये सत्ता स्थापन केलेली आहे.