Harbhajan Singh On Asia Cup 2025: येत्या काही दिवसात आशिया चषक २०२५ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. बीसीसीआयकडून लवकरच या स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली जाणार आहे. या संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. त्यामुळे कोणाला स्थान द्यायचं आणि कोणाला बसवायचं असा प्रश्न बीसीसीआयसमोर असणार आहे. दरम्यान भारताचा माजी खेळाडू हरभजन सिंगने या स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. दरम्यान या १५ सदस्यीय संघात त्याने कोणाला स्थान दिलं? जाणून घ्या.
भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंगने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “ अभिषेक शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह हे माझ्या संघात खेळताना दिसून येऊ शकतात. मी केएल राहुलची निवड केलेली नाही. तो यष्टिरक्षक फलंदाज म्हणून उत्तम पर्याय आहे. तो किंवा ऋषभ पंत दोघांपैकी एक तरी खेळाडू संघात हवा.”
तसेच तो शुबमन गिलबाबत बोलताना म्हणाला, “ टी-२० क्रिकेट म्हणजे फक्त मोठे फटके खेळणं असं नाही. जर शुबमन गिलने मोठे फटके खेळण्याचा निर्णय घेतला, तर तो देखील कोणापेक्षा कमी नाही. तो उत्तम फलंदाज आहे. मैदानाच्या चारही बाजूंना धावा करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.”
“गिलने आयपीएल स्पर्धेत ऑरेंज कॅप देखीप पटकावली आहे. यासह प्रत्येक हंगामात त्याने धावांचा पाऊस पाडला आहे. ऑरेंज कॅप कोणालाही सहज मिळत नाही. तो केवळ १२० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतो असं नाही, तर तो १६०- १७० च्या स्ट्राईक रेटनेही फलंदाजी करू शकतो.”
आशिया चषक स्पर्धेसाठी असा आहे हरभजन सिंगने निवडलेला भारतीय संघ:
अभिषेक शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह