Harbhajan Singh Vs MS Dhoni: हरभजन सिंग व भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी या दोघांमधील मतभेदाच्या अफवांवर हरभजनने खुलासा केला आहे. हरभजनने डिसेंबर २०२१ मध्ये त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमधून ब्रेक घेतला होता. निवृत्तीनंतर, ऑफ-स्पिनरने राष्ट्रीय संघातून त्याच्या हकालपट्टीबद्दल बोलताना कधीच चुकीचे शब्द उच्चारले नाहीत. मात्र अलीकडे एका मुलाखतीदरम्यान, तो म्हणाला की, त्याला वाटते की जर संघ व्यवस्थापनाकडून भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला दिला तसा पाठिंबा मिळाला असता तर इतर माजी खेळाडू आणखी काही वर्षे खेळू शकले असते,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरभजनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीच्या उत्तरार्धात संघाचा कर्णधार धोनी होता. अशावेळी धोनीबाबत हरभजनची ही टिप्पणी विशेषतः धोनीच्या चाहत्यांनी जास्तच मनावर घेतली व इथूनच दोघांमधील संबंध चांगले नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या. यानंतर हरभजनने आणखी एका मुलाखतीत आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.

हरभजन म्हणाला की “मला एमएस धोनीची अडचण का असेल? आम्ही भारतासाठी खूप क्रिकेट खेळलो आणि आम्ही खूप चांगले मित्र होतो आणि अजूनही आहोत. तो त्याच्या आयुष्यात बिझी झाला, आणि मी माझ्यामध्ये व्यग्र झालो, आम्ही खूप वेळा भेटत नाही. पण काहीही मतभेद नाहीत. त्याने माझी मालमत्ता काढून घेतली नाही (हसते). पण हो, मला त्याच्या काही मालमत्तांमध्ये, विशेषतः त्याच्या फार्महाऊसमध्ये खूप इंटरेस्ट आहे असे म्हणत हरभजनने सर्व वादाच्या अफवांना विराम दिला.

हे ही वाचा<<रोहित शर्माचा ‘या’ व्यक्तीला लग्नाची मागणी घालताना Video Viral; नेटकरी म्हणतात, “रितिका वहिनीचा थोडा विचार…”

एमएस धोनीने २०२० मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला फुलस्टॉप दिला. पण, तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये अजूनही खेळतो . 31 मार्चपासून सुरू होणार्‍या आयपीएल २०२३ हा धोनीचा शेवटचे सीझन असल्याच्या चर्चा सुद्धा आता रंगत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbhajan singh reaction to fight with ms dhoni says he has not taken my property explains why indian spinner retired svs
First published on: 20-03-2023 at 12:42 IST