Hardik Pandya Jasmine Walia Breakup: भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. हार्दिक पंड्या आणि नताशा स्टँकोविक यांचा घटस्फोट झाल्यानंतर हार्दिक पंड्याचं नाव ब्रिटिश-भारतीय अभिनेत्री, गायिका जास्मिन वालिया हिच्याबरोबर जोडलं जात होतं. पण आता या दोघांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरू आहे.

हार्दिक आणि जास्मिन एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवा बऱ्याच काळापासून सुरू आहेत. पण, दोघांनीही हे नातं कधीच सार्वजनिकरित्या स्वीकारलं नाही. सोशल मीडियावर एकत्र दिसणाऱ्या पोस्ट कधीकधी त्यांच्यातील जवळीक दर्शवत होत्या. पण पोस्टमध्येही त्यांनी एकमेकांचा स्पष्ट उल्लेख कधीच केला नाही.

हार्दिक आणि जास्मिन यांच्या डेटिंगच्या चर्चांदरम्यान या दोघांचा ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे. दोघांनीही एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे, ज्यामुळे या दोघांचं नातं तुटल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

आयपीएलदरम्यान जास्मिन वालिया मुंबई इंडियन्सचे जवळपास सर्वच सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होती. मुंबई इंडियन्सच्या सामन्यांमध्ये ती हार्दिक पंड्या आणि संघाला चिअर करतानाचे फोटो, व्हीडिओही व्हायरल झाले होते. इतकंच नव्हे तर तिला मुंबई इंडियन्सच्या टीम बसमध्ये जातानाही पाहिलं गेलं. वृत्तानुसार, जास्मिन त्याच टीम बसमधून प्रवास करत होती जी खेळाडूंच्या कुटुंबांसाठी, त्यांच्या पत्नी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी असते. यावरून हो दोघेही डेट करत असल्याच्या चर्चांना अधिक उधाण आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Hardik Pandya Unfollow Jasmine Walia on Instagram
Jasmine Walia Unfollow Hardik Pandya on Instagram

कोण आहे जास्मिन वालिया?

जास्मिन वालिया ही एक गायिका आणि अभिनेत्री आहे. तिने इंग्रजी, पंजाबी आणि हिंदी अशा अनेक भाषांमध्ये गायक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. तिच्या गाण्यांमुळे ती विशेषतः दक्षिण आशियाई संगीत इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. २०१७ मध्ये तिचं बॉम डिगी हे गाणं रिलीज झालं. या गाण्यामुळे जास्मिन वालिया अधिक प्रसिद्धीझोतात आली. जास्मिनने हे गाणं ब्रिटिश-पाकिस्तानी गायक झॅक नाईट याच्याबरोबर गायलं होतं. बॉलीवूड चित्रपट ‘सोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटातील हे गाणं आहे.