Hardik Pandya Photos Viral With India’s Cricketer Sister: टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आज ११ ऑक्टोबर २०२४ रोजी त्याचा ३१वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या हार्दिकचे काही फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यात तो दिल्लीतील एका हॉटेलमधील ‘मिस्ट्री गर्ल’बरोबर त्याचे फोटो समोर आले आहेत. भारत बांगलादेश दुसऱ्या टी-२० सामन्यात हार्दिकने बॅटने शानदार खेळी केली आणि एक शानदार झेलही घेतला होता. पण हार्दिकबरोबर फोटो व्हायरल झालेली ही मुलगी नेमकी आहे कोण, जाणून घेऊया.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये जी मुलगी आहे ती भारतीय क्रिकेटपटूची बहीण आहे. जिचं नाव कोमल शर्मा असून ती भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू अभिषेक शर्माची बहीण आहे. कोमल शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आयपीएलदरम्यानही ती अनेकदा स्टेडियममध्ये आपल्या भावासाठी चियर करताना दिसली आबे. सहसा ती तिचा भाऊ अभिषेकबरोबरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते, मात्र आता तिने हार्दिकबरोबर काही फोटो शेअर केले आहेत, ज्याला पाहून चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. याशिवाय या फोटोवरील तिच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: कॅप्टन असावा तर असा… रोहित शर्माने अपघातग्रस्त मुशीर खानसाठी केलं असं काही की चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

अभिषेक शर्माची बहीण कोमल शर्माने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याबरोबर दिसत आहे. हार्दिकला भेटून कोमलला खूप आनंद झाला असून या खास क्षणाचे फोटो शेअर करताना तिने असे लिहिले आहे की, माझी आवडती पोझ, माझ्या सर्वात जास्त आवडत्या व्यक्तीबरोबर दिलेली माझी आवडती पोझ. शेवटी मला असा कोणीतरी भेटला आहे ज्याच्याबरोबर माझी एनर्जी मॅच होते. असे म्हणत तिने ५ फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा – PAK vs ENG: पाकिस्तानचा इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव, १४७ वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोमलने शेअर केलेले हे फोटो दिल्लीतील आयटीसी मौर्या हॉटेलमधील आहे, जिथे टीम इंडिया बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० थांबली होती. काही चाहते वेगवेगळी चर्चा करत आहेत तर ही मिस्ट्री गर्ल कोण असं व्हायरल फोटोवर प्रश्नही विचारत आहेत. यामुळे हार्दिक पंड्या पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.