दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या महिला टी-२० विश्वचषकाच्या चौथ्या सामन्यात आज भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने आहेत. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक गमावली आहे, तर पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तान संघाची कर्णधार बिस्माह मारूफने नाणेफेक जिंकून ‘आम्हाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल’ असे सांगितले. ही कोरडी विकेट आहे, त्यात फारसा बदल होणार नाही. त्यामुळे आम्हाला धावसंख्या उभारायला आवडेल, अशी बिस्माह मारूफ म्हणाली. कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली, आम्हाला फलंदाजी करायची होती. कारण या विकेट जरा अवघड आहेत. स्मृती मंधानाच्या जागी हरलीन देओलला संधी दिली आहे. यापूर्वी तिरंगी मालिकेतही आमच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आमच्या संघाची गोलंदाजी मजबूत आहे.

स्मृती मानधना खेळत नाही –

टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मंधाना या सामन्यात खेळत नाहीये. दुखापतीमुळे तिला बाहेर बसावे लागले. मंधानाच्या जागी हरलीन देओलला संघात स्थान मिळाले आहे. शेफाली वर्मा आणि भाटिया ओपनिंग करताना दिसतील. केपटाऊनमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणार्‍या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील गट-२ मधील हा दुसरा सामना आहे. या गटातील पहिला सामना शनिवारी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात झाला.

टी-२० मध्ये भारत-पाकिस्तान संघाची आकडेवारी –

टी-२० फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे पाकिस्तानवर नेहमीच वर्चस्व राहिले आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण १३ सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने १० वेळा विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानने केवळ ३ वेळा विजय मिळवला आहे. गेल्या ६ सामन्यांपैकी भारताने ४ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने २ वेळा विजय मिळवला आहे.

पाकिस्तान महिला संघ (प्लेइंग इलेव्हन): जावेरिया खान, मुनीबा अली (डब्ल्यू), बिस्मा मारूफ (कर्णधार), निदा दार, सिद्रा अमीन, आलिया रियाझ, आयेशा नसीम, ​​फातिमा सना, आयमान अन्वर, नशरा संधू, सादिया इक्बाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय महिला संघ (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर सिंग