राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतील मिश्र दुहेरी प्रकारात प्राजक्ता सावंतला सहभागी करून घेण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने वेळापत्रकात आवश्यक बदल केला आहे. ७८वी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा नवी दिल्ली येथे शुक्रवारपासून सुरू होत आहे.  
सनावे थॉमसच्या साथीने प्राजक्ता मिश्र दुहेरी प्रकारात सहभागी होणार होती. त्यानुसार तिने प्रवेशिका संयोजकांकडे पाठवली होती. मात्र केरळ बॅडमिंटन संघटनेने सनावेच्या विनंतीनंतर त्याची प्रवेशिका मागे घेतली होती. यामुळे ही प्रवेशिका स्वीकारण्यास संयोजकांनी नकार दिला होता. यानंतर प्राजक्ताने कायदेशीर मार्ग पत्करला होता. दरम्यान, प्राजक्तासह भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने अक्षय देवलकर आणि प्रज्ञा गद्रे या जोडीचाही समावेश स्पर्धेच्या वेळापत्रकात केला आहे.