Mitchell Johnson on David Warner: सलामीवीर डेव्हिड वॉर्नरवर टीका करताना ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने संतापजनक विधान केले आहे. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत डेव्हिड वॉर्नरला संधी दिल्याने मिचेल जॉन्सनने संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका १४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. पहिला कसोटी सामना १४ ते १८ डिसेंबर दरम्यान पर्थ येथे खेळवला जाणार आहे.

तो गुन्हेगार असून मोठ्या निरोपाच्या समारंभाला पात्र नाही- मिचेल जॉन्सन

पाकिस्तानला २६ ते ३० डिसेंबर दरम्यान मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळायचा आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी येथे ३ ते ७ जानेवारी २०२४ या कालावधीत नवीन वर्षात खेळवला जाईल. वास्तविक, पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या १४ सदस्यीय संघात आक्रमक सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला संधी देण्यात आली आहे. मिचेल जॉन्सनने त्याचा सहकारी डेव्हिड वॉर्नरला निरोपाची मालिका देण्यात का आली यावर जोरदार टीका केली आहे. त्याच्या मते, “तो गुन्हेगार असून मोठ्या निरोपाच्या मालिका समारंभाला पात्र नाही.”

Vikram Rathour on Shubman Gill
Shubman Gill : ‘एक दिवस शुबमन तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्त्व करेल…’, माजी बॅटिंग कोचचे मोठे वक्तव्य
England scored more than 400 runs in both innings
ENG vs WI 2nd Test : इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास, कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला ‘हा’ मोठा पराक्रम
, Shamar Joseph six video
ENG vs WI 2nd Test : शमर जोसेफच्या षटकराने प्रेक्षक गॅलरीचे तुटले छत, चाहते थोडक्यात बचावले, VIDEO व्हायरल
Warner had conceded that he was open to the idea of one last dance with the ODI team in the Champions Trophy next year in Pakistan.
David Warner : ‘…म्हणून डेव्हिड वॉर्नरला संघातून वगळले’, मुख्य निवडकर्त्याने सांगितले कारण
in IND vs PAK Final World Championship Of Legends 2024
इरफान पठाणने कराची कसोटीची करून दिली आठवण, जबरदस्त इनस्विंगरवर युनूस खानला केले क्लीन बोल्ड, पाहा VIDEO
Yuvraj Singh explosive batting 28 balls 59 runs
WLC 2024 : ५ षटकार… ४ चौकार, युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाला करुन दिली जुन्या दहशतीची आठवण
Pakistan beats Indian champions by 68 runs
लेक आणि जावयासमोर शाहिद आफ्रिदीचा शानदार खेळ, पाकिस्तानची भारतीय चॅम्पियन्सवर ६८ धावांनी मात
Sourav Ganguly Statement on Virat Kohli Form in T20 World Cup 2024
“विराटबद्दल तर बोलूच नका…”, वर्ल्डकपमध्ये फॉर्मात नसलेल्या कोहलीवर सौरव गांगुलीचे मोठे वक्तव्य, म्हणाले; “३-४ सामने”

हेही वाचा: World Cup 2024 : ‘जर हार्दिक थेट आयपीएल खेळला, तर…’; आशिष नेहराचे टी-२० विश्वचषकातील कर्णधारपदाबाबत मोठं वक्तव्य

मिचेल जॉन्सनचा डेव्हिड वॉर्नरवर राग

मिचेल जॉन्सन म्हणाला की, “२०१८ मध्ये बॉल टॅम्परिंगची घडलेली घटनार आणि त्यानंतर एका वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागल्यानंतर डेव्हिड वॉर्नर निरोपाच्या मालिका मिळण्यास पात्र नाही.” मिचेल जॉन्सनने २०१८ मध्ये झालेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात अडकलेल्या डेव्हिड वॉर्नरला गुन्हेगार म्हणून संबोधले आहे. द- वेस्ट वृत्तानुसार, डेव्हिड वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतच या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

‘द वेस्ट ऑस्ट्रेलियन’ मधील लेखात मिचेल जॉन्सन म्हणाला, “बॉल टॅम्परिंग घटनेला पाच वर्षे झाली आहेत. डेव्हिड वॉर्नरचा उद्दामपणा आणि आपल्या देशाबद्दलच्या अनादर अजूनही तसाच आहे. डेव्हिड वॉर्नरच्या निरोपाच्या मालिकेसाठी आम्ही तयारी करत आहोत, कोणी सांगेल का असे का? संघर्ष करणाऱ्या कसोटी सलामीवीराला स्वतःच्या निवृत्तीची तारीख का निवडावी लागते?” असे म्हणत त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला प्रश्न विचारले आहेत.

हेही वाचा: Rahul Dravid: “आम्ही त्याला प्रशिक्षक होण्यासाठी…”, सौरव गांगुलीने द्रविडचा कार्यकाळ वाढवण्याबाबत केले मोठे विधान

२०१३-१४ अ‍ॅशेस मालिकेतील निर्भेळ यश आणि २०१५ एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यासह ही जोडी ऑस्ट्रेलियासाठी पाच वर्षांहून अधिक काळ एकत्र खेळली आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये निवृत्त झालेल्या जॉन्सनने ऑस्ट्रेलियासाठी ७३ कसोटी सामन्यांमध्ये ३१३ विकेट्स घेतल्या.