आंतरराष्ट्रीय स्तरावरील मातब्बर संघांना टक्कर देण्यासाठी भारतीय हॉकी संघाला अद्यापही बरीच मेहनत करणे आवश्यक असल्याचे जागतिक हॉकी लीगच्या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. पाचव्या-सहाव्या स्थानासाठीच्या लढतीत बेल्जियमने भारतावर २-१ अशी मात केली. या पराभवामुळे भारताला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
बेल्जियमविरुद्धचा मुकाबला चुरशीचा झाला. दोन्ही संघांनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. ५९व्या मिनिटाला निकीन थिमिय्याने भारतातर्फे गोल केला. पिछाडीवर पडलेल्या बेल्जियमतर्फे सामना संपायला काही मिनिटे असताना दोन गोल झाल्याने भारताचा पराभव झाला आणि त्यांना सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. सहाव्या स्थानामुळे जागतिक क्रमवारीत तीन स्थानांनी सुधारणा होण्याची शक्यता
आहे.