India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाने ४७१ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडनेही ४६५ धावा केल्या आहेत. भारतीय संघाने पहिल्या डावात ६ धावांची आघाडी घेतली. या सामन्यात आता तिन्ही निकाल लागू शकतात. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांना सामना जिंकण्याची संधी आहे, तर सामना ड्रॉ देखील होऊ शकतो. दरम्यान भारतीय संघाला जर हा सामना जिंकायचा असेल, तर भारतीय संघाला दुसऱ्या डावात किती धावा कराव्या लागतील? जाणून घ्या.

हेडिंग्लेचा रेकॉर्ड पाहिला, तर २०१७ नंतर या मैदानावर ६ सामने खेळले गेले आहेत. हे सर्व सामने दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या संघाने जिंकले आहेत. हेडिंग्लेमध्ये ६ वेळेस २५० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला आहे. इंग्लंडने ४ वेळेस हा कारनामा करून दाखवला आहे. तर वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी १-१ वेळेस २५० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.

हेडिंग्लेच्या मैदानावर सर्वात मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्याचा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाने १९४८ मध्ये ४०४ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या सामन्यात ३५९ धावांचा यशश्वी पाठलाग केला होता.

इंग्लंडने २००१ मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या सामन्यात ३१५ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. ३ वर्षांपूर्वीच म्हणजे २०२२ मध्ये इंग्लंडने न्यूझीलंडविरूद्ध खेळताना २९६ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली आहे. ते पाहता भारतीय संघाला दुसऱ्या डावात ३०० ते ३५० पेक्षा अधिक धावांचा डोंगर उभारावा लागेल. तर भारतीय संघ हा सामना जिंकू शकतो.

भारतीय संघाच्या १०० धावा पूर्ण

भारतीय संघाने दुसऱ्या डावात १०० धावा पूर्ण केल्या आहेत. भारतीय संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलला हवी तशी सुरूवात करता आली नाही. यशस्वी जैस्वाल ४ धावांवर माघारी परतला. तर केएल राहुलने दमदार अर्धशतकी खेळी केली आहे. पहिल्या डावात शून्यावर बाद होणाऱ्या साई सुदर्शनने या डावात ३० धावांची खेळी केली. तर शुबमन गिल ८ धावांवर माघारी परतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.