कनिष्ठ गटाच्या जोहर चषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व मनप्रितसिंगकडे सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा २२ ते २९ सप्टेंबर या कालावधीत जोहर बाहेरू येथे होणार आहे.
हॉकी इंडियाने हा संघ जाहीर केला. भारताच्या उपकर्णधारपदी अफान युसुफ याची निवड करण्यात आली आहे. या संघाचे सराव शिबिर ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीत येथील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर होणार आहे.
भारतीय संघ- गोलरक्षक-हरज्योतसिंग, सुशांत तिर्की. बचावफळी-अमित रोहिदास, जारमनप्रितसिंग, कोठाजितसिंग, सुरेंदरकुमार, सुखमनजितसिंग, परदीप मोर. मध्यरक्षक-मनप्रितसिंग (कर्णधार), प्रभदीपसिंग, हरजितसिंग, सतबीरसिंग, इम्रानखान. आघाडी फळी-मनदीप सिंग, अमोन मिराश तिर्की, महंमद अमीरखान, तलविंदरसिंग, अफान युसुफ (उपकर्णधार).