यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील सामने अटीतटीचे होत आहेत. आज (३१) ऑगस्ट रोजी भारत-हाँगकाँग यांच्यात लढत झाली. भारताने विजयासाठी दिलेल्या १९३ धावांचे आव्हान हाँगकाँगला गाठता आले नाही. परिणामी भारताचा ४० धावांनी विजय झाला. या सामन्यात हाँगकाँगचा पराभव झालेला असला तरी याच संघातील किंचित शाह या खेळाडूने त्याच्या प्रेमाला मात्र जिंकलं आहे. त्याने हा सामना झाल्यानंतर स्टेडियममध्येच आपल्या प्रेयसीला फिल्मी स्टाईलने प्रपोज केले. विशेष म्हणजे किंचितला त्याच्या प्रेयसीने होकारदेखील दिला.

हेही वाचा >>> अखेर दुष्काळ संपला! विराट कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस, झळकावले दमदार अर्धशतक

हाँगकाँगच्या किंचित शाहने त्याच्या प्रेयसीला सामना संपल्यानंतर प्रपोज केलं. विशेष म्हणजे या प्रपोजनंतर त्याच्या प्रेयसीने त्याला होकारदेखील दिला. आजच्या सामन्यात हाँगकाँगचा पराभव झाला. मात्र किंचितच्या या अनोख्या प्रपोजमुळे आजचा सामना चांगलाच अविस्मरणीय ठरला.

हेही वाचा >>>INDvsHKG : रवींद्र जडेजाचा ‘डायरेक्ट हीट’ पाहून सारेच अवाक्, विराट म्हणतो हा तर गोट्या खेळतोय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आजच्या सामन्यातही किंचित शाहने संघाला विजय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केला. सलामीचे फलंदाज स्वास्तात बाद झाल्यानंतर त्याने तिसऱ्या विकेटसाठी फलंदाजीला येत मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला. त्याने २८ चेंडूंमध्ये दोन चौकार आणि एक षठकार यांच्या मदतीने ३० धावा केल्या. पुढे हाँगकाँग संघाला २० षटकांत १५२ धावा करता आल्या. तर भारताचा ४० धावांनी विजय झाला.