scorecardresearch

न्यूझीलंड ओपनमध्ये प्रणॉय, सौरभ वर्माची आगेकूच, कश्यपला पराभवाचा धक्का

प्रणॉयची धडाकेबाज कामगिरी

एच.एस.प्रणॉय ( संग्रहीत छायाचित्र )
एच.एस.प्रणॉय ( संग्रहीत छायाचित्र )

न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच.एस.प्रणॉय आणि सौरभ वर्मा यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. प्रणॉयने हाँग काँगच्या वेई नॅनवर दोन सरळ सेट्समध्ये मात केली. अवघ्या ४६ मिनीटात प्रणॉयने नॅनचा २१-१८, २१-१९ असा पराभव केला.

दुसरीकडे भारताच्याच सौरभ वर्माने परुपल्ली कश्यपवर मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. चुरशीच्या झालेल्या सामन्यात सौरभ वर्माने कश्यपवर २१-१८, १३-२१, २१-१६ अशी मात केली. पुढच्या फेरीत सौरभचा सामना इस्त्राईलच्या मिशा झिलबरमन किंवा हाँगकाँगच्या ली च्युक यिऊशी होणार आहे. चीन तैपेईच्या चीया हुंग लू ने सिरील वर्माचा १३-२१, १४-२१ असा पराभव केला.

अमेरिकन ओपनमधला एच.एस.प्रणॉयचा फॉर्म या स्पर्धेतही कायम आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतीयांच्या कामगिरीवर सर्वांची नजर असणार आहे.

अवश्य वाचा – भारतीय बॅडमिंटनपटूंची धडाकेबाज कामगिरी, चिनी ड्रॅगनला टाकलं मागे

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-08-2017 at 20:15 IST

संबंधित बातम्या