R Ashwin On Fitness Critics: रविचंद्रन अश्विनने गोलंदाजीत नावीन्यपूर्ण खेळी करत आपले करिअर घडवले आहे. पदार्पणानंतर १३ वर्षांनंतरही अश्विन हा कसोटी सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा भारतातील दुसरा खेळाडू ठरला आहे. अलीकडेच त्याने भारताचे माजी महिला प्रशिक्षक डब्ल्यू व्ही रमन यांच्याशी गप्पा मारताना, अश्विनने आधुनिक काळातील खेळाच्या आवश्यकतेनुसार स्वत: ला तयार करण्यासाठी केलेल्या सर्व गोष्टींबद्दल खुलासा केला.

अश्विनने स्पोर्टस्टारच्या शोमध्ये भारताच्या माजी सलामीवीरासह चर्चेत असे म्हटले की, “माझ्या आयुष्यात मी केलेल्या सर्वात सोप्या त्यागांपैकी एक हाच आहे. मी माझ्या तंदुरुस्तीवर खूप मेहनत घेतली आहे, परंतु मी ते कधीही माझ्याविरुद्ध ठेवणार नाही किंवा ते कधीही कारण म्हणून देणार नाही. मी असे म्हणण्याचे कारण म्हणजे खेळ मला खूप आवडत असलेली गोष्ट आहे. आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट खूप आवडत असेल, तर तुम्हाला त्यात तुकवून राहण्यासाठी जे काही करावे लागेल ते करावंच लागतं. “

४८९ बळी आणि असंख्य गोलंदाजी विक्रमांसह, अश्विनने नेहमीच संघाला स्वतःपेक्षा प्राधान्य दिले आहे. संघाच्या गरजेनुसार अश्विनने कित्येक सामने राखीव म्हणून खेळताना सुद्धा कधी तक्रार केली नाही. उलट तो कबूल करतो की फिटनेसच्या बाबतीत, तो विराट कोहलीसारख्या खेळाडूच्या समान पातळीवर कधीच पोहोचणार नाही पण या मर्यादा मान्य करूनही त्याने आपल्या विचार व खेळावर पूर्ण नियंत्रण मिळवले आहे.

मी विराट कोहली नाही हे मान्य करतो..

अश्विन सांगतो की, “मी माझ्या आवडीच्या पदार्थांचा त्याग केला आहे, मी माझ्या जीवनशैलीचा त्याग केला आहे, मी दुप्पट कठोर प्रशिक्षण घेतले आहे आणि तरीही मी विराट कोहली कधीच होऊ शकलो नाही. आणि ही गोष्टी मी आता शांतपणे स्वीकारली आहे. मुळात त्याचा आणि माझा प्रवास वेगळा आहे. मी, नैसर्गिकरित्या ऍथलेटिक नसणे ही अशी गोष्ट आहे जी माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्याबरोबर एक टॅग म्हणून अडकली आहे परंतु तिने मला कठोर परिश्रम करण्यापासून आणि क्रिकेटमध्ये टिकून राहण्यापासून कधीही रोखले नाही. माझ्यासाठी, स्वतःला जमिनीवर ठेवण्यास आणि गरज पडेल तिथे संघासाठी खेळण्याची संधी महत्त्वाची आहे जी माझ्या कौशल्याच्या बळावर मला मिळते. मी याला त्याग म्हणून पाहात नाही, हा आनंद आहे,हा एक प्रवास आहे.

हे ही वाचा<< “रोहित शर्माने मला का खेळवलं नाही, हे कळतंय! त्याला त्याचा..”, आर. आश्विनचं विश्वचषकात संधीच्या वादावर स्पष्ट उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नुकत्याच संपलेल्या विश्वचषकात भारतासाठी फक्त एक सामना खेळल्यानंतर, आता रविचंद्रन अश्विन १० डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात असणार आहे.