टी-२० विश्वचषक २०२२च्या उपांत्य फेरीत भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभव पत्कारावा लागला. त्यामुळे भारतीय संघाचे अनेक वर्षाचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. त्यानंतर भारतीय संघावर सातत्याने टीका होत आहे. अशातच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने डेली टेलिग्राफच्या स्तंभात लिहिले की, भारतीय संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वात अंडर-परफॉर्मिंग संघ आहे. यावर आता भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आपली बाजू मांडली आहे.

हार्दिक पांड्या म्हणाला की, भारतीय संघाला स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणाला काही समजावून सांगण्याची गरज नाही. होय, त्यांना काही गोष्टी सुधारण्याची गरज आहे.

हेही वाचा – Virat Kohli: मुंबई विमानतळावर विराट-अनुष्का कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हायरल व्हिडिओ

हा एक खेळ आहे आणि तुम्हाला त्यात अधिक चांगले होण्याची गरज आहे: हार्दिक पांड्या

न्यूझीलंडविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेपूर्वी हार्दिक पांड्या म्हणाला, ”बघा, सत्य हे आहे की जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करत नाही तेव्हा लोक त्यांची बाजू तुमच्यासमोर ठेवतात, ज्याचा आम्ही सर्वजण आदर करतो. मला माहित आहे की प्रत्येकाचे स्वतःचे मत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मला वाटते की, आम्हाला कोणाला काही सिद्ध करण्याची गरज नाही. तुम्ही चांगले होत राहता आणि गेममध्ये बरेच काही शिकता. अशा काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे करण्याची गरज आहे आणि आम्हाला नक्कीच चांगले करायला आवडेल.”

हार्दिक पांड्या पुढे म्हणाला, ”आम्ही टी-२० विश्वचषकात चांगली कामगिरी केली नाही पण आम्ही सर्व अनुभवी खेळाडू आहोत. या सर्व गोष्टी समजून घेऊन पुढे जायला हवे. चुकांमधून शिकूनच माणूस चांगला बनतो.”

मायकेल वॉनने डेली टेलिग्राफच्या स्तंभात लिहिले की, ”मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारत हा सर्वात अंडर-परफॉर्मिंग टीम आहे. संघात प्रतिभेची कमतरता नाही पण असे असूनही ते टी-२० क्रिकेट चांगले खेळत नाहीत. त्यांच्याकडे खेळाडू आहेत पण त्यांचा योग्य वापर होत नाही. मला समजत नाही की भारत पहिल्या 5 षटकांमध्ये विरोधी संघाला वर्चस्व का निर्माण करु देतो?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.