झिवाच्या जन्मावेळी पत्नी साक्षीसोबत नव्हतो हा अत्यंत कठीण काळ असल्याचे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एका कार्यक्रमात व्यक्त केले. चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या व्यवस्थापनाकडून एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये धोनीने संघ आणि एकूणच आयपीएल स्पर्धेवर अनुसरून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे तर दिलीच. पण, सोबत वैयक्तिक आयुष्यातील प्रसंगांवर देखील दिलखुलास गप्पा मारल्या. ऑस्ट्रेलिया दौऱयात आपल्या लाडक्या लेकीची भरपूर आठवण आल्याचे धोनीने यावेळी सांगितले. धोनी म्हणाला की, “झिवाच्या जन्मावेळी मी भारतात नव्हतो. त्यामुळे मला तिला पाहताच आले नाही. हा माझ्यासाठी अत्यंत कठीण काळ होता.” तसेच एका चिमुकल्या जीवाच्या स्मित हास्यामुळे तुमच्या जीवनाला नवे वळण मिळते. तुम्ही देशासाठी खेळा किंवा चेन्नईसारख्या बलाढ्य संघासाठी खेळा याची त्या चिमुकल्या जीवाला काहीच पर्वा नसते. आपला जवळचा व्यक्ती जवळ नसला म्हणून तिला रडावेसे वाटते आणि ती रडते, असेही धोनी पुढे भावूक होऊन म्हणाला.
संग्रहित लेख, दिनांक 21st Apr 2015 रोजी प्रकाशित
झिवाच्या जन्मावेळी साक्षीसोबत नव्हतो हा अत्यंत कठीण काळ- महेंद्रसिंग धोनी
झिवाच्या जन्मावेळी पत्नी साक्षीसोबत नव्हतो हा अत्यंत कठीण काळ असल्याचे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने एका कार्यक्रमात व्यक्त केले.
First published on: 21-04-2015 at 07:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I had not seen ziva when she was born was a tough period ms dhoni