scorecardresearch

Premium

ऑलिम्पिक पदक मिळवणं सोपी गोष्ट नाही, मी पूर्ण प्रयत्न करेन – मेरी कोम

ऑलिम्पिकसाठी मेहनतीची गरज

ऑलिम्पिक पदक मिळवणं सोपी गोष्ट नाही, मी पूर्ण प्रयत्न करेन – मेरी कोम

भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोम आगामी २०२० टोकियो ऑलिम्पिकसाठी कसून तयारी करत आहे. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मेरी कोम सध्या मोजक्या स्पर्धांमध्ये खेळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या Indonesia President Cup स्पर्धेत मेरीने सुवर्णपदकाची कमाई केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तमाम भारतीय चाहते तिच्याकडून पदकाची अपेक्षा करत आहेत.

“लोकांना माझ्याकडून पदकाच्या अपेक्षा आहेत हे ऐकून मला खूप छान वाटतंय. त्यांनी माझ्याकडून अशी अपेक्षा करणं योग्य आहे, मात्र ऑलिम्पिक पदक मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी प्रचंड मेहनीतीची गरज आहे. मात्र मी पदक मिळवण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करेन.” मेरी कोम ANI वृत्तसंस्थेशी बोलत होती.

दरम्यान, इंडोनेशियातील मानाच्या President Cup स्पर्धेत भारताची सर्वोत्कृष्ट महिला बॉक्सर मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली. ५१ किलो वजनी गटात मेरी कोमने आपल्या ऑस्ट्रेलियन प्रतिस्पर्धी एप्रिल फ्रेंक्सचा ५-० च्या फरकाने पराभव केला. आगामी ऑलिम्पिक स्पर्धा लक्षात घेता, मेरी कोमने ठराविक स्पर्धांमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही मेरी सहभागी झाली नव्हती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: I will try my best to win olympic medal says boxer mary kom psd

First published on: 01-08-2019 at 15:56 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×