विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. न्यूझीलंडने ५० षटकात २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील २४१ धावाच केल्या. त्यामुळे सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.
The England players are jubilant! Jofra Archer is in tears!
The greatest cricket match of all time?#CWC19 | #CWC19Final pic.twitter.com/2HIA63RF4y
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 14, 2019
IT’S COME HOME!#CWC19Final pic.twitter.com/FCJymt6aAE
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 14, 2019
नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय फसला. इंग्लंडच्या वेगवान माऱ्यापुढे न्यूझीलंडला केवळ २४१ धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले. त्याने ५५ धावांची खेळी केली. तर डावाच्या शेवटच्या टप्प्यात टॉम लॅथम याने ४७ धावांची उपयुक्त खेळी केली. इतर फलंदाजांना मात्र चांगली खेळी करता आली नाही. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट या दोघांनी ३-३ बळी टिपले.
या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि जोस बटलर या दोघांनी मोठी भागीदारी करून इंग्लंडच्या आशा पल्लवित केल्या. या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. सामन्यात बटलर बाद झाल्यावर इंग्लंडच्या आशा काहीशा मावळल्या पण स्टोक्सने शेवटपर्यंत तग धरून सामना सुपर ओव्हरमध्ये नेला. सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत (१५ धावा) सुटला, त्यामुळे मूळ सामन्यातील चौकार षटकारांच्या निकषावर इंग्लंडला नवा विश्वविजेता जाहीर करण्यात आले.

सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला विश्वविजेता ठरवण्यात आले.
गोलंदाज - जोफ्रा आर्चर
बॉल ० - व्हाईड
बॉल १ - २ धावा (नीशम)
बॉल २ - षटकार (नीशम)
बॉल ३ - २ धावा (नीशम)
बॉल ४ - २ धावा (नीशम)
बॉल ५ - १ धाव (नीशम)
बॉल ६ - १ धाव आणि धावचीत (गप्टील)
गोलंदाज - ट्रेंट बोल्ट
बॉल १ - ३ धावा (स्टोक्स)
बॉल २ - १ धाव (बटलर)
बॉल ३ - चौकार (स्टोक्स)
बॉल ४ - १ धाव (स्टोक्स)
बॉल ५ - २ धावा (बटलर)
बॉल ६ - चौकार (बटलर)
विश्वचषक स्पर्धा २०१९ चा अंतिम सामना सुपर ओव्हरमध्ये गेलेला आहे. न्यूझीलंडने ५० षटकात ८ बाद २४१ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडनेदेखील शेवटच्या चेंडूवर १ धाव काढत २४१ धावा करण्यात यश मिळवले. त्यामुळे आता सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये होणार आहे.
फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात वोक्स झेलबाद, यष्टीरक्षक टॉम लॅथमने घेतला झेल
अर्धशतक पूर्ण केल्यावर मोठा फटका खेळताना जोस बटलर झेलबाद झाला. इंग्लंडची जमलेली जोडी फुटली आणि न्यूझीलंडला मोठा दिलासा मिळाला. बटलरने ६० चेंडूत ५९ धावा केल्या.
अतिशय दडपणाच्या परिस्थितीत उत्तम खेळ करत बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी आपली अर्धशतके साजरी केली. त्यामुळे आता सामना रंगतदार स्थितीत आहे.
स्टोक्स-बटलर जोडीने डाव सावरला
सावध खेळ करताना कर्णधार मॉर्गनला मोठा फटका मारण्याचा मोह आवरला नाही. उसळत्या चेंडूवर त्याने फटका खेळला आणि लॉकी फर्ग्युसनने त्याचा अप्रती झेल टिपला. मॉर्गनने २२ चेंडूत ९ धावा केल्या.
एकदा जीवनदान मिळालेला धोकादायक सलामीवीर जॉनी बेअरस्टो स्वतःच्याच चुकीने बाद झाला. बाहेरच्या दिशेला जाणारा चेंडू मारण्याच्या नादात बॅटची कड लागून तो त्रिफळाचीत झाला. त्याने ५५ चेंडूत ७ चौकारांसह ३६ धावा केल्या.
स्विंग होणाऱ्या चेंडूंना बाचकत खेळणारा अनुभवी जो रूट कॉलिन डी ग्रँडहोमच्या गोलंदाजीवर माघारी परतला. बाहेरच्या दिशेने स्विंग होणाऱ्या चेंडूला बॅटची कड लागून तो झेलबाद झाला. त्याने ३० चेंडूत केवळ ७ धावा करून तंबूत परतला.
न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीचा अत्यंत सावधपणे सामना करत जॉनी बेअरस्टो - जो रूट जोडीने १४ व्या षटकात इंग्लंडला अर्धशतकी मजल मारून दिली.
उपांत्य फेरीत दमदार खेळी करणारा जेसन रॉय अंतिम सामन्यात २० चेंडूत १७ धावा करून माघारी परतला. त्याने ३ चौकार लगावले, पण मॅट हेन्रीने त्याला झेलबाद केले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने ५० षटकात ८ बाद २४१ धावा केल्या. सलामीवीर निकोल्सचे केलेले अर्धशतक (५५) आणि टॉम लॅथमच्या झुंजार ४७ धावा यांच्या बळावर न्यूझीलंडने इंग्लंडला २४२ धावांचे आव्हान दिले. ख्रिस वोक्स आणि लिअम प्लंकेट यांनी प्रत्येकी ३-३ बळी टिपले.
टॉम लॅथमने झुंजार खेळी करत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला अर्धशतकाने हुलकावणी दिली. त्याने २ चौकार आणि १ षटकार खेचत ४७ धावा केल्या.
मोठा फटका खेळताना झाला झेलबाद
चांगला खेळ करण्याची अपेक्षा असलेला अष्टपैलू जिमी निशम मोठा फटका मारताना झेलबाद झाला. २५ चेंडूत ३ चौकारांसह त्याने १९ धावा केल्या.
न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर हा खराब पंचगिरीचा शिकार ठरला. त्याला पंचांनी पायचीत बाद ठरवले. बॉल ट्रॅकिंग प्रणालीमध्ये चेंडू स्टंपच्या वरून जात असल्याचे दिसून आले, पण सलामीवीर गप्टीलने रिव्ह्यू वाया घालवल्यामुळे न्यूझीलंडकडे रिव्ह्यू शिल्लक नव्हता. त्यामुळे त्यांना DRS ची मदत घेता आली नाही. टेलरने ३१ चेंडूत १५ धावा केल्या.
एक बाजू लावून धरत सलामीवीर हेन्री निकोल्स याने संयमी अर्धशतक केले, पण त्यानंतर ५५ धावांवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने या खेळीत केवळ ४ चौकार लगावले.
अत्यंत शांत खेळी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन झेलबाद होऊन माघारी परतला. मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले होते, पण DRS प्रणालीमध्ये तो बाद असल्याचे दिसून आले. त्यामुळे न्यूझीलंडला दुसरा धक्का बसला. विल्यमसनने ५३ चेंडूत २ चौकार लगावत ३० धावा केल्या.
इंग्लंडच्या भेदक वेगवान माऱ्यामुळे न्यूझीलंडने सावध पवित्रा स्वीकारत १४ व्या षटकात अर्धशतकी मजल मारली.
स्पर्धेत फारशी चांगली कामगिरी न करणारा सलामीवीर मार्टिन गप्टील स्वस्तात माघारी परतला. त्याने १८ चेंडूत २ चौकार आणि १ षटकार खेचत १९ धावा केल्या.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोनही संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
लॉर्ड्सच्या मैदानावर अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला प्रचंड पाऊस पडला. रात्रभर पडलेल्या पावसामुळे आता नाणेफेकीला विलंब झाला असून नाइफेक १५ मिनिटे उशिराने होणार आहे.
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना होत आहे. या दोनही संघांकडे आतापर्यंत एकही विश्वचषक विजेतेपद नाही, त्यामुळे आज सामन्याचा निकाल आल्यानंतर क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार आहे.