आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या तारखा जाहीर केल्या आहेत. लंडनमधील ओव्हल स्टेडियमवर ७ ते ११ जून २०२३ दरम्यान दुसरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळवली जाणार आहे. याबाबत आयसीसीकडून सांगण्यात आले आहे. यावेळी या फायनलसाठी १२ जून २०२३ हा राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.

सध्या, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे जागतिक कसोटी चॅम्पियनशिप टेबलमध्ये अव्वल दोन संघ आहेत. तरी ते अव्वल स्थानावर राहतील की नाही, हे बॉर्डर गावस्कर मालिका आणि न्यूझीलंड आणि श्रीलंका मालिकेवर अवलंबून असेल.

Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Real Madrid and Manchester City draw match
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : रेयाल-मँचेस्टर सिटीतील रंगतदार लढत बरोबरीत
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार
Big blow to England team before World Cup 2024
T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी बॉर्डर-गावसकर मालिका या फायनलमध्ये खेळण्याची भारताची शक्यता ठरवेल. कोणत्याही अडचणीशिवाय जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत थेट पोहोचण्यासाठी, भारताला बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला ४-० ने हरवणे गरजेचे आहे. यजमानांनी ३-० असा विजय मिळवला किंवा ३-१असा विजय मिळवला, तरीही भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचू शकतो. त्यासाठी त्यांना न्यूझीलंड आणि श्रीलंका मालिकेवर अवलंबून रहावे लागेल.

फायनल कोण खेळणार अजून ठरले नाही –

अंतिम सामना डब्ल्यूटीसी पॉइंट टेबलमधील अव्वल दोन संघांमध्ये होईल आणि ऑस्ट्रेलिया सध्या ७५.५६ च्या विजयी टक्केवारीसह नऊ संघांच्या गुणतालिकेत शीर्षस्थानी आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो, ज्यांच्या खात्यात ५८.९३ टक्के विजयाचे गुण आहेत. नागपुरात ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या मालिकेनंतर अंतिम फेरीतील संघ निश्चित होईल.

हेही वाचा – Test Cricket: १४५ वर्षात जे घडलं नाही ते अवघ्या ५ दिवसात पाहायला मिळालं; चंद्रपॉल- ब्रॅथवेटने नोंदवला सर्वात अनोखा विक्रम

एक दिवस राखीव –

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना ७ ते ११ जून दरम्यान खेळला जाणार आहे. त्याचबरोबर या सामन्यासाठी १२ जून राखीव ठेवण्यात आला आहे. जर या सामन्यातील एखादा दिवस पावसामुळे वाया गेला, तर निकाल लावण्यासाठी हा दिवस राखीव ठेवला आहे.

हेही वाचा – IND vs AUS: ‘किमान इथल्या खेळपट्ट्यांमुळे खेळाडूंचा जीव जात नाही…’; सुनील गावसकरांनी ऑस्ट्रेलियाला काढला चिमटा

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी हरल्यानंतरही भारत अशा प्रकारे पात्र ठरू शकतो –

जर भारताने मालिका ३-० ने जिंकली नाही तर भारतीय संघ अडचणीत येईल. कारण त्यांना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्यासाठी श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्धची कसोटी जिंकल्यास किंवा कसोटी अनिर्णित राहिल्यास भारत जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचेल.