West Indies fined 60 percent for slow over rate: आयसीसी विश्वचषक पात्रता स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या अडचणी वाढत आहेत. कारण झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा ३५ धावांनी पराभव झाला. त्यामुळे विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचा त्यांचा मार्ग कठीण झाला आहे. याशिवाय विंडीज संघाला या सामन्याशी संबंधित आणखी एक धक्का बसला आहे. वास्तविक, स्लो ओव्हर रेटमुळे वेस्ट इंडिजला मॅच फीच्या ६० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
वेस्ट इंडिजचा संघ सामन्यात तीन षटके मागे राहिला –
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ निर्धारित वेळेपेक्षा तीन षटके मागे होता. त्यामुळे संघाला ६० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ चे उल्लंघन केल्याबद्दल वेस्ट इंडिज संघ दोषी आढळला असून संघातील प्रत्येक खेळाडूला सुमारे २० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. विंडीजचा कर्णधार शाई होपने गुन्हा स्वीकारला असून कोणत्याही औपचारिक सुनावणीसाठी अर्ज केलेला नाही.
वेस्ट इंडिज संघापुढे निर्माण झाला पेच –
विश्वचषक पात्रता फेरीत वेस्ट इंडिजच्या अडचणी वाढत आहेत. वेस्ट इंडिजने क्वालिफायर स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे, पण विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचा मार्ग अजूनही खूप कठीण आहे. झिम्बाब्वेकडून झालेल्या पराभवामुळे वेस्ट इंडिजसमोर संकट निर्माण झाले आहे. वेस्ट इंडिज पात्रता स्पर्धेच्या सुपर सिक्ससाठी पात्र ठरले असले तरी, सुपर-६ मधील टॉप-२ फिनिशर्स विश्वचषक पात्रता तसेच विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.
हेही वाचा – MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीला एअर होस्टेसने दिले खास गिफ्ट, VIDEO होतोय व्हायरल
झिम्बाब्वेने चालू असलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ पात्रता फेरीत आणखी एक उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी शनिवारी दोन वेळा विश्वविजेता संघ वेस्ट इंडिजचा ३५ धावांनी पराभव केला. २६९ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ २३३ धावांवर गारद झाला. झिम्बाब्वेसाठी या सामन्यात अनुभवी अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाने चमकदार कामगिरी केली.
पुरण आणि चेसला सामना संपवता आला नाही –
निकोलस पूरनने ३४ आणि रोस्टन चेसने ४४ धावा केल्या, पण दोघांनाही सामना संपवता आला नाही. ठराविक अंतराने विकेट पडल्यामुळे विंडीजला पराभवाचा सामना करावा लागला. झिम्बाब्वेकडून तेंडाई चताराने तीन विकेट्स घेतल्या. मुजरबानी, इंगारवा आणि सिकंदर रझा यांना प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.