भारत-श्रीलंका टी-२० मालिकेनंतर आयसीसीने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. याशिवाय न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका दुसरी कसोटी, बांगलादेश-अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका आणि आयसीसी टी-२० विश्वचषक पात्रता ‘अ’च्या सामन्यांनाही क्रमवारीत स्थान मिळाले आहे. टी-२० सांघिक क्रमवारीत भारत २७० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

बाबर आझम टी-२० फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. श्रीलंकेचा पाथुम निसांका अव्वल १० मध्ये सहा स्थानांनी प्रगती करत नवव्या स्थानावर पोहोचला आहे, तर भारताचा केएल राहुल चार स्थानांनी घसरून १०व्या स्थानावर आला आहे आणि श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून वगळल्याने विराट कोहली टॉप १० मधून बाहेर पडत १५व्या स्थानावर पोहोचला आहे. विराट ४ मार्चला मोहालीत आपला १००वा कसोटी सामना खेळणार आहे, पण तत्पूर्वीच विराटला क्रमवारीत धक्का मिळाला आहे.

Royal Challengers Bangalore Unwanted Record
KKR vs RCB : आरसीबीच्या संघाने नोंदवला नकोसा विक्रम, IPL इतिहासात पहिल्यांदाच ‘या’ रेकॉर्डची झाली नोंद
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक

श्रीलंकेविरुद्ध सलग तीन अर्धशतके झळकावणारा श्रेयस अय्यर १८व्या स्थानावर पोहोचला आहे. यूएईच्या मुहम्मद वसीमला आयर्लंड विरुद्ध सुरेख शतक झळकावण्याचा फायदा झाला आणि तो १२व्या स्थानावर पोहोचला आहेय. यूएईच्या कोणत्याही फलंदाजासाठी सर्वोत्तम क्रमवारी आहे.

हेही वाचा – IPL 2022 : सुरैश रैनाची ‘या’ संघात होणार एन्ट्री..! व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण

गोलंदाजी क्रमवारीत तबरेझ शम्सी पहिल्या स्थानावर कायम आहे. श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाला भारताविरुद्ध मालिका न खेळण्याचा फटका बसला असून तो आता सहाव्या स्थानावर घसरला आहे. भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार १७व्या स्थानावर पोहोचला आहे. श्रीलंकेचा लाहिरू कुमारा ३७व्या स्थानावर पोहोचला आहे. यूएईचा जहूर खान ४२व्या स्थानावर तर आयर्लंडचा जोश लिटल ४९व्या स्थानावर पोहोचला आहे. यूएईचा रोहन मुस्तफा अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.