Arshdeep Singh to pick a wicket on the first ball of a T20 WC 2024 Match : भारत आणि अमेरिका यांच्यातील सामन्यात टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने आपल्या घातक गोलंदाजीने अमेरिकेच्या फलंदाजांना थक्क केले. टी-२० विश्वचषकातील २५ व्या सामन्यात अर्शदीपने पहिल्याच षटकापासून धोकादायक गोलंदाजी केली. त्याने पहिल्याच चेंडूवर अमेरिकेचा फलंदाज शायान जहांगीरला एलबीडब्ल्यू करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने अँड्रिस गॉसला २ धावांवर बाद केले. या शानदार कामगिरीच्या जोरावर अर्शदीप सिंगने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

अर्शदीप सिंगने रचला इतिहास –

अर्शदीप सिंग टी-२० विश्वचषकात पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. आजपर्यंत अर्शदीपच्या आधी कोणत्याही भारतीय गोलंदाजाला अशी कामगिरी करता आली नव्हती. जर जगभरातील गोलंदाजांबद्दल बोलायचे, तर बांगलादेशचा गोलंदाज मशरफी मुर्तझा याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेऊन टी-२० विश्वचषकात विक्रम केला होता. २०१४ मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने हा विक्रम केला होता.

IND vs USA : क्रिकेटच्या पटलावर भारतच महासत्ता; अमेरिकेचं आव्हान पार करत सुपर ८ मध्ये आगेकूच
penalty rule imposed
IND VS USA T20 World Cup: पेनल्टीचा भुर्दंड बसला आणि अमेरिकेने टाकली मान; काय आहे नवीन नियम?
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma abused Rishabh Pant and badly scolds for Dropped Easy Catch of Mitchell Marsh Video Viral
ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल
USA vs IND T20 World Cup 2024 Match Updates in Marathi
IND v USA: बोरिवलीतील अनेक खेळाडू या सामन्यात असं शास्त्रींनी म्हणताच रोहित शर्मा पाहा काय म्हणाला, “त्यांच्यासोबत एकत्र क्रिकेट…”

अर्शदीप सिंग ठरला जगातील चौथा गोलंदाज –

तसेच अफगाणिस्तानचा गोलंदाज शापूर झाद्रानने २०१४ मध्ये हाँगकाँगविरुद्ध हा विक्रम केला होता. नामिबियाचा गोलंदाज रुबेन ट्रम्पेलमनने हा पराक्रम दोनदा केला आहे. २०२१ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध आणि २०२४ मध्ये ओमानविरुद्ध त्याने ही कामगिरी केली आहे. आता अर्शदीप सिंग न्यूयॉर्कमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात या अनोख्या यादीत सामील झाला आहे. ही कामगिरी करणारा तो जगातील एकूण चौथा गोलंदाज ठरला आहे.

हेही वाचा – Team India : भारतीय संघाच्या स्टार खेळाडूवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया, ‘इतके’ महिने क्रिकेटच्या मैदानापासून राहणार दूर

टी-२० विश्वचषक सामन्यातील पहिल्या चेंडूवर विकेट्स घेणारे गोलंदाज :

मशरफे मोर्तझा (बागलादेश) विरुद्ध अफगाणिस्तान, २०१४
शापूर झाद्रान (अफगाणिस्तान) विरुद्ध हाँगकाँग, २०१४
रुबेन ट्रम्पलमन (नामिबिया) विरुद्ध स्कॉटलंड, २०२१
रुबेन ट्रंपेलमन (नामिबिया) विरुद्ध ओमान, २०२४
अर्शदीप सिंग (भारत) विरुद्ध अमेरिका, २०२४

हेही वाचा – IND vs USA : मिया मॅजिकची कमाल! मोहम्मद सिराजने नितीश कुमारचा सीमारेषेवर घेतला Sensational झेल, पाहा VIDEO

अर्शदीप सिंग टी-२० विश्वचषकात उत्कृष्ट फॉर्ममध्ये –

अर्शदीप सिंग या टी-२० विश्वचषकात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो सतत भेदक गोलंदाजी करताना दिसत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने ३१ धावा देताना इमाद वसीमची महत्त्वाची विकेट घेतली. त्यानंतर अर्शदीप सिंगने अखेरच्या षटकात १८ धावा वाचवून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. आयर्लंडविरुद्धही त्याने दमदार गोलंदाजी केली आणि ३५ धावांत २ विकेट्स घेतल्या होत्या.