टी-२० विश्वचषक २०२२ मधील ४१ वा सामना पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान बांगलादेशचा ४ विकेटसने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. परंतु या सामन्यात कर्णधार बाबर आझम आणि यष्टीरक्षक मोहम्मद रिजवान यांनी एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टी-20 विश्वचषक 2022 या मेगा स्पर्धेत दोघेही सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसले. बांगलादेशविरुद्ध बाबर आणि रिझवान या जोडीच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रमही जमा झाला. पहिल्या विकेटसाठी दोघांनी या स्पर्धेत प्रथमच अर्धशतकीय भागीदारी केली, मात्र ती सुद्धा कासवाच्या गतीने.

या दोघांनी पाकिस्तानसाठी ६३ चेंडूत ६७ धावांची भर घातली. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये कोणत्याही पूर्ण सदस्य देशाने पहिल्या विकेटसाठी केलेली ही सर्वात संथ अर्धशतकी भागीदारी होती. दोघेही मैदानात असताना पाकिस्तानचा धावसंख्येचा दर प्रति षटक ५.४२ धावा होता. बाबर आझमच्या रूपाने पाकिस्तानला पहिला धक्का बसला. बाबर ३३ चेंडूत २५ धावा काढून बाद झाला. यावेळी बाबरने फक्त दोन चौकार मारले. पाकिस्तानला १०.३ षटकांत पहिला धक्का बसला आणि त्यानंतर संघाची धावसंख्या ५७ अशी झाली.

हेही वाचा – PAK vs BAN T20 World Cup : पाकिस्तानची उपांत्य फेरीत धडक, पाच गडी राखून बांगलादेशचा पराभव

बाबर ११व्या षटकात बाद झाला, तर मोहम्मद रिझवान १२व्या षटकात बाद झाला. रिझवानने ३२ चेंडूत ३२ धावा केल्या. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना उपांत्यपूर्व फेरीपेक्षा कमी नव्हता. कारण येथे जो संघ जिंकेल त्याला उपांत्य फेरीचे तिकीट मिळणार होती. भारताने गट २ मधून उपांत्य फेरीचे तिकीट आधीच मिळवले आहे. दुसरीकडे ग्रुप १ मधून न्यूझीलंड आणि इंग्लंडने उपांत्य फेरी गाठली आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babar azam and mohammad rizwan is th slowest scoring rate ban vs pak t20 world cup 2022 vbm
First published on: 06-11-2022 at 15:13 IST