दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव करत भारतीय संघ दुसऱ्यांदा टी-२० चॅम्पियन ठरला आहे. या विजयानंतर आता भारतीय संघाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. या विजयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – T20 WC 2024: भारत ठरला विश्वविजेता, सूर्यकुमार यादवचा झेल आणि जसप्रीत बुमराहचे षटक ठरला टर्निंग पॉईंट

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

आयसीसी टी२० क्रिकेट विश्वचषक २०२४ वर भारतीय संघाने आपली मोहोर उमटवली आहे. प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. त्याला अक्षर पटेल, शिवम दुबे यांनी उत्तम साथ दिली. भारतीय संघाने समोर ठेवलेले १७७ धावांचे लक्ष दक्षिण आफ्रिकेचा संघ सहज पार करेल असे वाटत होते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

रोहित शर्माच्या कुशल नेतृत्वाखाली हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी केलेल्या टिच्चून गोलंदाजीच्या जोरदार भारतीय संघाने एक नेत्रदीपक विजय मिळवत आयसीसी टी२० क्रिकेट विश्वचषक २०२४ ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कप्तान रोहित शर्मा आणि संपूर्ण टीमचे मी हार्दिक अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.

दरम्यान, शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाने १४० कोटी भारतीयांचे स्वप्न साकारले. सामन्यातील अखेरच्या षटकात हार्दिक पंड्याने दमदार गोलंदाजी केली. भारताला विजयासाठी ६ षटकांत १६ धावांची गरज होती. तर मैदानात मिलर आणि केशव महाराजची जोडी होती. हार्दिकने फुलटॉस चेंडू टाकला जो मिलरने जोरदार फटका लगावला पण सीमारेषेवर उभा असलेल्या सूर्याने आश्चर्यकारक झेल टिपला आणि भारताच्या दिशेने सामना फिरवला.

हेही वाचा – Virat Kohli T20 Retirement: विश्वविजेतेपदासह विराट कोहलीचा टी२० ला अलविदा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्पूर्वी भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत आठ गडी गमावून १६९ धावा करता आल्या. या विजयासह भारताचा ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला. भारताने यापूर्वी २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक जिंकला आहे.