आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या एका धावेने पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघ टीकाकारांच्या तावडीत सापडला आहे. क्रिकेटपटूंपासून ते चाहत्यांपर्यंत बाबर आझमच्या कर्णधारपदाच्या टीमला टीकांचा सामना करावा लागत आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्तने संघ व्यवस्थापन आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (पीसीबी) टीका केली आहे.

सिकंदर बख्त म्हणाले की, पाकिस्तान संघ आता उपांत्य फेरीत पात्र होण्याची कोणतीही शक्यता नाही. माजी कसोटीपटू बख्त यांनीही रमीझ राजाने आता आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे म्हटले आहे.

सिकंदर बख्त यांनी जिओ सुपर टीव्ही चॅनलवरील तज्ञ म्हणून सांगितले की, “जर त्याच्यामध्ये थोडीशीही लाज असेल तर पीसीबी अध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा. केवळ अध्यक्षच नाही, तर मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक आणि फलंदाजी प्रशिक्षक मोहम्मद युसूफ यांनीही पायउतार व्हावे.”

हेही वाचा – IND vs SA T20 World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने ‘या’ गोलंदाजांपासून राहावे सावध, डेल स्टेनचा सल्ला

१९८३ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळलेल्या बख्तने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले “आम्ही नंबर वन फलंदाजाचे काय करावे? बाबर हा अव्वल फलंदाज आहे. हे मला माहीत आहे, पण त्याचे योगदान काय? तुमच्या क्रमवारीशी पाकिस्तानचा काहीही संबंध नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात आघाडीच्या संघाला ८ बाद १३० धावांवर रोखले होते, पण स्वत: ८ गडी गमावून मात्र केवळ १२९ धावा करता आल्या. त्यामुळे पाकिस्तानचा एका धावेने पराभव झाला. या पराभवानंतर पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे.