टी-२० विश्वचषकाच्या चौथ्या सामन्यात भारतीय सलामीवीर के. एल. राहुलला फलंदाजीमध्ये लय गवसल्याचं दिसून आलं. पहिल्या तीन सामन्यामध्ये दुहेरी धावसंख्याही गाठता न आलेल्या के. एल. राहुलने या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं. केवळ फलंदाजीच नाही तर क्षेत्ररक्षणामध्येही के. एल. राहुलने लिटन दासला धावबाद करत मोलाची भर घातली. लिटन दासने २१ चेंडूंमध्ये ५० धावांची वेगवान खेळी केली. मात्र तुफान खेळीदरम्यान एक चोरटी धाव घेण्याच्या नादात लिटन धावबाद झाला. लिटनला धावबाद करण्यामध्ये राहुलचा भन्नाट थ्रो कारणीभूत ठरला. लिटनच्या विकेटनंतर सामन्याला कलाटणी मिळाली.

नक्की पाहा >> Ind vs Ban: बंगलादेशने दिनेश कार्तिकची विकेट ढापली? ‘थर्ड अंपायर आंधळा आहे का?’ चाहत्यांचा Video शेअर करत प्रश्न

झालं असं की १८५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने पहिल्या सात षटकांमध्ये नाबाद ६६ धावांपर्यंत मजल मारली. अ‍ॅडलेडमध्ये पाऊस सुरु झाल्याने सामना थांबवण्यात आला. मात्र सामना थांबवण्यात आला त्या क्षणी डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीनुसार बांगलादेश हा निर्धारित धावसंख्येहून १७ धावांनी आघाडीवर होता.

नक्की वाचा >> Ind vs Ban: १० चेंडूत ४६ धावा! लिटन दासने भारतीय गोलंदाची पिसं काढत नोंदवले तीन भन्नाट विक्रम; असा पहिलाच खेळाडू ज्याने…

अर्धा तास संततधार पडल्यानंतर पाऊस थांबला आणि सामना सुरु झाला तेव्हा बांगलादेशला १६ षटकांमध्ये १५१ लक्ष्य निर्धारित करण्यात आलं. मात्र सामना सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर लिटन धावबाद झाला. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात त्याने लिटनने ऑफ साइडला चेंडू ढकलला. त्यानंतर तो गोलंदाजाच्या एण्डला धावत असतानाच ३० मीटरच्या सर्कलजवळून के. एल. राहुलने थेट थ्रो केला जो यष्ट्यांवर लागला.

नक्की वाचा >> Ind vs Ban: …अन् त्या शॉटबरोबरच विराटने अनोखा विश्वविक्रम आपल्या नावावर केला; यापूर्वी कोणालाही जमली नाही ही कामगिरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने अगदी शेवटच्या चेंडूवर हा सामना ५ धावांनी जिंकला. मात्र विजयासाठी कारणीभूत ठरलेली विकेट ही के. एल. राहुलच्या या भन्नाट थ्रोमुळेच मिळाली.