IND vs CAN T20 World Cup 2024 Match Cancelled: भारत आणि कॅनडामधील टी-२० क्रिकेटमधील पहिलाच सामना विश्वचषकात खेळवला जाणार होता. पण फ्लोरिडामधील पावसाने व्यत्यय आणल्याने भारताचा हा सामना रद्द करण्यात आला आहे. कॅनडाच्या खेळाडूंना भारताविरुद्ध खेळून चांगला अनुभव मिळवण्याची संधी होती. मात्र पावसामुळे मैदान खूप ओले असल्याने सामना रद्द करण्यात आला. अमेरिकेच्या खेळाडूंनी भारताविरुद्ध चांगली कामगिरी करून नाव कमावले होते. कॅनडालाही ही संधी होती पण पावसाने खेळ बिघडवला. सुपर८ च्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेल्या कॅनडाचा हा स्पर्धेतील शेवटचा सामना होता. पण फ्लोरिडामध्ये पावसाने विश्रांती घेतली होती, पण तरीही सामना रद्द का झाला, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

पहिले ३ सामने जिंकून भारताने सुपर८ मध्ये स्थान पक्के केले होते. भारत सुपर८ मध्ये पोहोचला तर अ गटात असल्याने A1 म्हणून सुपर८ मध्ये त्यांचे सामने होतील. हा सामना रद्द झाल्यामुळे भारताचे ७ गुण झाले आहेत. अमेरिका ५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारत अ गटात पहिल्या स्थानी कायम राहिला आहे.

Japan womens gymnastics Team captain of Paris Olympics Games 2024 for smoking
Paris Olympics 2024 : सिगारेट ओढणे ‘या’ स्टार खेळाडूला पडले चांगलेच महागात, ऑलिम्पिकमधून पाठवण्यात आले मायदेशी
Hardik Pandya pulled out of ODI series
IND vs SL : टीम इंडियाला मोठा धक्का! श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून हार्दिक पंड्या बाहेर? जाणून घ्या काय आहे कारण?
When Indian Team Reach India After Winning T20 World Cup 2024
भारतीय संघासह बार्बाडोसमध्ये अडकलेले पत्रकार जय शाहांमुळे मायदेशी परतणार, ४ जुलैला टीम इंडिया….
BCCI Made Changes in India Squad for 2 IND vs ZIM Series
झिम्बाब्वेविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात मोठे बदल, अचानक ३ नवे खेळाडू संघात दाखल; काय आहे नेमकं कारण?
Reserve day for India vs South Africa final
IND vs SA : फायनल आणि राखीव दिवशीही पावसाचं सावट; सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार जेतेपदाचा करंडक?
T20 World Cup 2024 India vs England Semi Final 2 Match Preview in Marathi
IND vs ENG Semi Final 2 : पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणत्या संघाला होणार फायदा?
T20 World Cup Semi Finals, IND vs ENG
“विश्वचषक भारतासाठीच, बाकीच्यांवर अन्याय”, मुंबईत राहणाऱ्या इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा ‘या’ मुद्द्यावरून ICC वर मोठा आरोप
What if IND v ENG Gets Washed Out due to rain
T20 WC 2024: भारत-इंग्लंड सेमीफायनल पावसामुळे रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये जाणार? वाचा उपांत्य फेरीचे नियम

हेही वाचा – गिलने रोहित शर्माला केलं अनफॉलो? शिस्तभंग केल्याने वर्ल्डकप संघातून शुबमनला रिलीज करणार? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

भारत-कॅनडा सामना का रद्द झाला?

फ्लोरिडामध्ये गेले काही दिवस पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पावसासोबतच शहराला पूराचा धोकाही दिला होता. अमेरिका आणि आयर्लंडमधील सामनाही पावसामुळे रद्द झाला होता. यामुळेच अमेरिकेचा संघ सर्वाधिक गुणांसह भारतानंतर सुपर८ साठी क्वालिफाय झाला. ज्यामुळे पाकिस्तानला स्पर्धेबाहेर जावे लागले. पण नाणेफेकीपूर्वीच फ्लोरिडामध्ये पावसाने विश्रांती घेतली. पण तरीही सामना मात्र शेवटपर्यंत खेळवला गेला नाही. याचे कारण म्हणजे फ्लोरिडामधील सततच्या पावसामुळे मैदान खूप ओले झाले होते. खेळपट्टी कव्हर्सने झाकली होती, पण मैदानाचा उर्वरित भाग पावसामुळे मात्र ओला झाला. मैदानाचा एक भाग इतका ओला झाला होता की अथक प्रयत्नांनंतरही तो ओलाच राहिला. चार हेयर ड्रायर्सनेही सुकवण्याचा प्रयत्न केला पण तरीही मैदानाचा भाग सुकला नाही आणि सामना रद्द करण्यात आला.

हेही वाचा – IND vs USA: “तू सूर्यकुमारला का आऊट नाही केलंस?”, नवज्योत सिंग सिद्धूने विचारलेल्या प्रश्नावर नेत्रावळकरने दिले उत्तर; म्हणाला- ‘त्याचा झेल…’

अ गटातून भारत आणि अमेरिका सुपर8 मध्ये पोहोचले आहेत तर कॅनडा, पाकिस्तान आणि आयर्लंड बाहेर झाले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला २० जूनला अफगाणिस्तानविरुद्ध सुपर८ मध्ये पहिला सामना खेळायचा आहे. अफगाणिस्तान विरुद्धचा हा सामना वेस्ट इंडिजमधील बार्बाडोस येथील किंग्स्टन ओव्हल मैदानावर होणार आहे.

हेही वाचा- T20 WC 2024: “शाहीन नाराज, रिजवानला हवे होते कर्णधारपद” पाकिस्तान संघात दुफळी

यानंतर भारतीय संघ आपला दुसरा सामना २२ जूनला अँटिगा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळणार आहे. हा सामना भारतीय संघ कोणत्या संघाविरुद्ध खेळणार हे अद्याप जाहीर झालेले नाही. पण बांगलादेश आणि नेदरलँड यापैकी एक संघ असू शकतो, असे मानले जात आहे. टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर८ मध्ये भारतीय संघाला २४ जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात मोठा सामना खेळायचा आहे. हा सामना सेंट लुसिया येथे होणार आहे. रात्री ८ वाजल्यापासून भारताचे सर्व सामने खेळवले जातील.