T20 World Cup IND vs ZIM: T20 विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियाचा संघ निवडण्याची प्रक्रिया सुरुवातीपासूनच वादाचा मुद्दा ठरली होती. विश्वचषकासाठी धाडण्यात आलेल्या १५ खेळाडूंमध्ये अनेकांना संधी देण्यात आली नव्हती. दुसरीकडे निवडलेल्या १५ जणांपैकी अनेकजण प्लेइंग ११ मध्ये समाविष्ट होण्यासाठी अजूनही वाटच पाहत आहेत. ऋषभ पंत, युझवेंद्र चहल या खेळाडूंना अद्यापही हवी तशी संधी देण्यात आलेली नाही. टीम इंडियाच्या या निवडप्रक्रियेवर अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी टीका केली आहे याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग याची कमेंट सध्या चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिकी पॉन्टिंग याने सांगितले की, “कार्तिक आणि पंत विश्वचषकासाठी भारताच्या ट्यून-अप गेम्समध्ये एकत्र खेळले आहेत, परंतु आशिया चषकापासून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड केवळ अनुभवी खेळाडूंनाच निवडत आहेत, संघाच्या बांधणीत कोणतेही प्रयोग केलेले नाहीत. भारताकडे पर्याय म्हणून ऋषभ पंत आहे जो अष्टपैलु खेळाडू असल्याने फलंदाजी व गोलंदाजी दोन्ही बाजूंनी संघात योगदान देऊ शकतो. पंतला संघात न भूमिकेचे आश्चर्य वाटल्याचेही पॉन्टिंगने म्हंटले आहे.

पॉन्टिंगने सांगितले की, “पंत खेळत नाही याचे मला आश्चर्य वाटते. त्याने सामने जिंकून दिले आहेत, तो डावखुरा आहे, ज्याची टीम इंडियाला मधल्या फळीत मदत होऊ शकते. असे असूनही टीम इंडियाने पंतला हवी तशी संधी दिलेली नाही. टीम इंडिया काही प्रमाणात ऑस्ट्रेलियाप्रमाणेच खेळत आहे, त्यांचा सर्वोत्तम संघ कसा तयार करावा हे त्यांना कधीच कळले नाही, कदाचित त्यांना येथे कोणत्या प्रकारची परिस्थिती मिळेल हे त्यांना माहीत नव्हते, यामुळेच टीम इंडियाला प्रत्येक सामन्यात जिंकण्यासाठी शेवटच्या षटकापर्यंत लढावे लागते”.

विराट कोहलीने १००% फेक फिल्डिंग केली पण..भारतीय माजी क्रिकेटरने बांग्लादेशच्या बाजूने केलं मोठं विधान

दरम्यान, भारत टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीत खेळताना पंतला समाविष्ट करेल असाही अंदाज पॉन्टिंगने व्यक्त केला आहे. ऋषभ पंतबद्दल एक गोष्ट आहे की तो एक सामना विजेता आहे. ऑस्ट्रेलियामध्ये, कसोटी क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये त्याने काय केले ते आम्ही पाहिले आहे जर भारताने त्याला संधी दिली तर तो टीमसाठी एक मोठी खेळी खेळू शकेल असा विश्वास पॉन्टिंगने दर्शवला आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs zim rohit sharma and rahul dravid ignores rishabh pant ricky ponting says team india never understand svs
First published on: 05-11-2022 at 11:31 IST