T20 World Cup 2022, IND vs ZIM Highlights Score Updates: टी२० विश्वचषक २०२२ मधील सुपर-१२ फेरीतील शेवटचे ३ सामने रविवारी (दि. ५ नोव्हेंबर) खेळले गेले. यातील तिसरा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात मेलबर्न येथे संपन्न झाला. भारतीय संघ टी२०विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत अगोदरच पोहचला असून झिम्बाब्वेविरुद्धचा सामना केवळ औपचारिकता होती. पण गटातील अव्वलस्थान कायम राखण्यासाठी टीम इंडियाला हा विजय आवश्यक होता आणि त्यांनी तो मिळवला. टी२० विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेवर ७१ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला. सूर्यकुमार यादवची झंझावती खेळी आणि लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने तगडे लक्ष्य उभे केले. त्यानंतर गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. भारताने या विजयासह ग्रुप २ मध्ये ८ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर इंग्लंडचे आव्हान असणार आहे.

भारताने झिम्बाब्वेसमोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २० षटकांत ५ गडी गमावून १८६ धावा केल्या.आजच्या सामन्यात भारतीय संघात दिनेश कार्तिक ऐवजी ॠषभ पंतला संधी देण्यात आली. सलामीला आलेला कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. तो केवळ १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने केएल राहुलसोबत ६० धावांची भागीदारी करत मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. केएल राहुलने या सामन्यात अर्धशतक झळकावले. हे त्याचे टी२० विश्वचषकातील सलग दुसरे अर्धशतक होते. त्याने यावेळी ५१ धावांची खेळी केली. यामध्ये ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्याचबरोबर सूर्यकुमारने २५ चेंडूत ६१ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याने सामन्याच्या शेवटी काही अविश्वसनीय फटके मारले. सूर्यकुमारने आपल्या खेळीत सहा चौकार आणि चार षटकार मारले. या दोघांव्यतिरिक्त विराट कोहली (२६) आणि हार्दिक पंड्या (१८) यांनी दोन आकडी धावसंख्या पार करत संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले. दिनेश कार्तिकच्या जागी संधी मिळालेल्या ॠषभ पंत याला या सामन्यात फक्त ३ धावा करता आल्या.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!
Heinrich Klaassen who scored an unbeaten 80 runs against MI
IPL 2024 : हेनरिचला ‘क्लास’ खेळीसाठी सनरायझर्स हैदराबादकडून मिळाले खास ‘गिफ्ट’, PHOTO होतोय व्हायरल

झिम्बाब्वेकडून गोलंदाजी करताना चार गोलंदाजांना विकेट्स घेण्यात यश आले. शॉन विलियम्स याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने २ षटकात ९ धावा देत २ गडी बाद करण्याची कामगिरी केली. त्याच्याव्यतिरिक्त सिकंदर रझा, ब्लेसिंग्स मुझरबानी आणि रिचर्ड नगारवा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. उपांत्य फेरीतील टीम इंडियाचा सामना ऐतिहासिक अॅडलेड ओव्हल मैदानावर १० तारखेला होणार आहे. जर हा सामना पावसामुळे रद्द झाला तर भारत थेट अंतिम फेरीत पोहचेल.

Live Updates

India vs Zimbabwe Highlights Match Updates in Marathi: भारत विरुद्ध झिम्बाब्वे हायलाइट्स अपडेटस्

16:50 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: टीम इंडियाचा झिम्बाब्वे तब्बल ७१ धावांनी विजय

ग्रुप बी मध्ये अव्वल स्थान कायम राखत टीम इंडियाचा झिम्बाब्वे तब्बल ७१ धावांनी विजय

झिम्बाब्वे सर्वबाद ११५

16:49 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: रोहित-कोहलीला भेटण्यासाठी चाहता थेट मैदानात

सामना सुरु असताना टीम इंडियाचा चाहता कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला भेटण्यासाठी थेट मैदानात आला.

झिम्बाब्वे ११५-९

16:46 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: झिम्बाब्वेची एकमेव आशा सिकंदर रझा बाद

झिम्बाब्वेची एकमेव आशा असणारा सिकंदर रझा ३४ धावा करून बाद झाला आहे. हार्दिक पांड्याने त्याला बाद केले.

झिम्बाब्वे १११-९

16:41 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: नागरवा रिचर्ड बाद, भारत विजयापासून दोन विकेट्स दूर

आर. अश्विनने एकाच दोन गडी बाद केले. नागरवा रिचर्ड अवघी एक धाव काढून बाद झाला.

झिम्बाब्वे १०६-८

https://twitter.com/BCCI/status/1589214009357914112?s=20&t=qCQZ6VV1_bIqYw0iGsIa2Q

16:39 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: मासकाडजा वेलिंग्टन बाद, अश्विनला मिळाली दुसरी विकेट

झिम्बाब्वे संघ पूर्णपणे आता सामन्यातून बाहेर पडला असे वाटते आहे. मासकाडजा वेलिंग्टन अवघी १ धाव करून बाद झाला. अश्विनला त्याची दुसरी विकेट मिळाली.

झिम्बाब्वे १०४-७

https://twitter.com/BCCI/status/1589212866053570564?s=20&t=MBfxtwdyuGx9FbcW9Izppg

16:30 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: बर्ल रेयानला अश्विनने केले बाद

झिम्बाब्वेची मोठ्या पडझडीनंतर बर्ल रेयान आणि सिकंदर रझा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाल्यावर आर. अश्विनने बर्ल रेयानला त्रिफळाचीत केले. त्याने ३५ धावा केल्या.

झिम्बाब्वे ९६-६

https://twitter.com/BCCI/status/1589210755723046913?s=20&t=CsrntO-ZEm8N2E7iSf9O8Q

16:28 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: बर्ल रेयान - सिकंदर रझा यांच्यात अर्धशतकी भागीदारी

झिम्बाब्वेची मोठ्या पडझडीनंतर बर्ल रेयान आणि सिकंदर रझा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली.

झिम्बाब्वे ९५-५

16:15 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: दहा षटकात धावांच्या तुलनेत झिम्बाब्वे खूप मागे

दहा षटकात टीम इंडियाने केलेल्या धावांच्या तुलनेत झिम्बाब्वे खूप मागे पडली आहे. ६० चेंडूत १२८ धावा करायच्या आहेत.

झिम्बाब्वे ५९-५

16:09 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: भारताने दोन्ही रिव्ह्यू गमावले

भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर टीम इंडियाने दोन्ही रिव्ह्यू गमावले.

झिम्बाब्वे ४७-५

16:03 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: झिम्बाब्वेला पाचवा धक्का, मुन्योंगा टोनी बाद

मोहम्मद शमीने झिम्बाब्वेला आणखी एक धक्का दिला. मुन्योंगा टोनीने अवघ्या ५ धावा करत तंबूत परतला.

झिम्बाब्वे ३६-५

https://twitter.com/BCCI/status/1589204049806913536?s=20&t=ChM4j87vpY0Jbn2C2OC95A

15:58 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: हार्दिक पांड्याने कर्णधार क्रेग एरविन केले बाद

हार्दिक पांड्याने कर्णधार क्रेग एरविन बाद केले. त्याने स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेत अनोख्या पद्धतीने बाद केले. त्याने १३ धावा केल्या.

झिम्बाब्वे ३१-४

https://twitter.com/BCCI/status/1589202672107724800?s=20&t=R0edKJKpbcVVRye7OVabfQ

15:53 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: पॉवर प्ले मध्ये झिम्बाब्वेची अडखळत सुरुवात, विलियम्स शॉन बाद

पॉवर प्ले मध्ये झिम्बाब्वेची अडखळत सुरुवात झाली आहे. पहिल्या दोन विकेट्स लवकर पडल्यानंतर कर्णधार क्रेग एरविन आणि विलियम्स शॉन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करत असताना मोहम्मद शमीने विलियम्सला भुवनेश्वरकरवी झेलबाद केले.

झिम्बाब्वे २८-३

https://twitter.com/BCCI/status/1589201696676143104?s=20&t=S9OiTkOHDc441tISg73NFg

15:32 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: झिम्बाब्वेला दुसरा धक्का, चकाब्वा रेगिस बाद

चकाब्वा रेगिस देखील भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. अर्शदीप सिंगने झिम्बाब्वेला दुसरा धक्का दिला. झिम्बाब्वे संघ अडचणीत

झिम्बाब्वे २-२

https://twitter.com/BCCI/status/1589196054443933697?s=20&t=UVuVSGe7IcUEaNtS4Y0kdQ

15:28 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: भुवनेश्वरची विकेट मेडन सुरुवात

झिम्बाब्वेची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकात सलामीवीर मधिवीरे वेस्ली बाद झाला आणि भुवनेश्वरने पहिले षटक निर्धाव टाकले.

झिम्बाब्वे ०-१

15:23 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: झिम्बाब्वेला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का

मधिवीरे वेस्ली भोपळाही न फोडता माघारी परतला. भुवनेश्वरने विराटकरवी झेल घेत पहिल्याच चेंडूवर बाद केले.

झिम्बाब्वे ०-१

https://twitter.com/BCCI/status/1589193938421788673?s=20&t=uFxW6qugVMsqKzgQ-a0RzQ

15:11 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: सुर्यकुमारच्या वादळी खेळीने झिम्बाब्वेसमोर ठेवले १८७ धावांचे आव्हान

सुर्यकुमारच्या वादळी खेळीने झिम्बाब्वेसमोर ठेवले १८७ धावांचे आव्हान ठेवले आहे.

भारत १८६-५

15:07 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: सुर्यकुमार यादवचे दमदार अर्धशतक

सुर्यकुमार यादवने आपला फॉर्म कायम ठेवत शानदार अर्धशतक झळकावले. २३ चेंडूत ५१ धावा केल्या. तब्बल २०० पेक्षा अधिकच्या सरासरीने त्याने या धावा केल्या.

भारत १७६-५

https://twitter.com/BCCI/status/1589190255772856320?s=20&t=7jmwhGgNfB6hDXnQJCwCcQ

15:04 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: हार्दिक पांड्या बाद

मोठा फटका मारण्याच्या नादात हार्दिक पांड्या बाद झाला असून त्याने १८ धावा केल्या.

भारत १६६-५

14:57 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: सुर्यकुमारच्या १००० धावा पूर्ण

एका वर्षात टी२० क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करणारा सुर्यकुमार यादव हा पहिलाच भारतीय ठरला आहे.

भारत १५२-४

https://twitter.com/BCCI/status/1589187260964294657?s=20&t=MEF_iEs52LPBqasv4vswdA

14:52 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: शेवटची तीन षटके टीम इंडियासाठी महत्वाची

१७० पेक्षा अधिक धावसंख्या करण्यासाठी शेवटच्या तीन षटकात आणखी मोठे फटके मारण्याची गरज आहे. खास करून हार्दिक पांड्याला धावगती वाढवणे गरजेचे आहे.

भारत १३८-४

14:48 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: मुजरबानी ब्लेसिंगच्या एका षटकात तीन चौकार

हार्दिक पांड्या आणि सुर्यकुमार यादव यांच्या एका षटकात तीन चौकार मारत टीम इंडियाच्या बाजूने मोमेंटम बदलला. त्या षटकात १८ धावा काढल्या.

भारत १२९-४

14:36 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: ॠषभ पंत बाद, भारताला चौथा धक्का

दिनेश कार्तिकच्या संघात संधी मिळालेला ॠषभ पंत अवघ्या तीन धावा करून बाद झाला. टीम इंडिया थोडी अडचणीत

भारत १०१-४

https://twitter.com/BCCI/status/1589182097284997120?s=20&t=VvBpZLZON00JD6dLbzvIGA

14:29 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: केएल राहुल सलग दुसरे अर्धशतक करून बाद

केएल राहुलने शानदार अर्धशतक करत दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्याने ३५ चेंडूत ५१ धावा केल्या. त्याला सिकंदर रझाने बाद केले.

भारत ९५-३

https://twitter.com/BCCI/status/1589180459862626304?s=20&t=pKPGBFQyWzY759MmcsNYaw

14:26 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: भारताला मोठा धक्का, विराट कोहली बाद

टीम इंडियाला मोठा धक्का बसला. विराटने २५ चेंडूत २६ धावा केल्या. त्याला विलियम्स शॉनने बाद केले.

भारत ८७-२

https://twitter.com/BCCI/status/1589179609589088256?s=20&t=67KNw8oY3Cg0Dyr3D-CBJg

14:17 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: पहिल्या १० षटकात भारत मजबूत स्थितीत

विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या अर्धशतकी भागीदारीने टीम इंडिया पहिल्या दहा षटकात मजबूत स्थितीत पोहचली आहे.

भारत ७९-१

14:06 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: भारताचे ५० धावा पूर्ण

भारताचे ५० धावा पूर्ण झाल्या. विराट कोहली आणि राहुल यांना मोठी भागीदारी करण्याची गरज आहे.

भारत ५८-१

13:59 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: पॉवर प्ले मध्ये भारताची चांगली सुरुवात

पॉवर प्ले मध्ये भारताने चांगली सुरुवात केली आहे. कर्णधार रोहित बाद झाल्यानंतर इन-फॉर्म फलंदाज विराट कोहली आणि केएल राहुल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

भारत ४६-१

13:50 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: कर्णधार रोहित शर्मा बाद, भारताला पहिला धक्का

टीम इंडियाला पहिला धक्का बसला असून कर्णधार रोहित शर्मा १५ धावांवर बाद झाला. त्याला मुजरबानी ब्लेसिंगने बाद केले.

भारत २७-१

https://twitter.com/BCCI/status/1589170700828299265?s=20&t=EltWUHHRKbeRsrQvJloLmQ

13:46 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: केएल राहुलचा शानदार षटकार

केएल राहुलने शानदार षटकार मारत भारताला सुरुवात करून दिली. त्याच्या या षटकारावर विराटने देखील टाळ्या वाजवल्या.

भारत २०-०

13:38 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: पहिल्या नऊ चेंडूनंतर पहिली धाव

पहिल्या नऊ चेंडूनंतर पहिली धाव टीम इंडियाने काढली. झिम्बाब्वेची चांगली सुरुवात

भारत २-०

13:36 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: झिम्बाब्वेचा नागरवा रिचर्डचे निर्धाव षटक

झिम्बाब्वेने पहिले षटकात एकही धाव दिली नाही. केएल राहुलने पहिल्या षटकात एकही धाव काढली नाही. नागरवा रिचर्डचे निर्धाव षटक

भारत ०-०

13:28 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल मैदानात

टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल मैदानात आले असून सामन्याला सुरुवात झाली आहे.

भारत ०-०

13:24 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात

सुपर -१२ मधील हा शेवटचा सामना असून भारतीय संघ आपली विजयी घौडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करेन. राष्ट्रगीतासाठी दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात आले आहे.

13:16 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: कर्णधार म्हणून रोहित शर्माचा ५०वा टी२० सामना

झिम्बाब्वेविरुद्ध होणारा आजचा सामना टीम इंडियाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माचा ५०वा टी२० सामना असणार आहे. जेव्हापासून त्याने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे तेव्हापासून त्याचा त्याने चांगले प्रदर्शन केले आहे.

https://twitter.com/BCCI/status/1589160115856642049?s=20&t=bbyFMgyIZ2PqYt5FyC-cbg

13:10 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: झिम्बाब्वे प्लेईंग-११

झिम्बाब्वेने संघात दोन बदल केले. जोंगवे ल्यूक आणि शुम्बा मिल्टन यांच्याऐवजी मासकाडजा वेलिंग्टन आणि मुन्योंगा टोनी यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.

https://twitter.com/BCCI/status/1589161070203408385?s=20&t=bbyFMgyIZ2PqYt5FyC-cbg

13:05 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: टीम इंडिया प्लेईन -११

भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून दिनेश कार्तिक ऐवजी ॠषभ पंतचा समावेश करण्यास करण्यात आला.

https://twitter.com/BCCI/status/1589159446324084736?s=20&t=Qtkw5DuCWMk4kVNODUmb1w

13:00 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: थोड्याच वेळात होणार नाणेफेक

भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि झिम्बाब्वेचा क्रेग एरविन नाणेफेकीसाठी मैदानात दाखल झाले असून थोड्याच वेळात होणार आहे.

12:51 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: पिच रिपोर्ट

इरफान पठाण ने सांगितलेल्या पिच रिपोर्टनुसार "मेलबर्नची खेळपट्टी ही नेहमी गोलंदाजांना साथ देणारी आहे. आणि ड्रोप-इन पिच असल्यामुळे इथे १७० हा चांगली धावसंख्या असेल असे त्याने सांगितले. त्यामुळे जो कोणता संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणार." असे त्याने मत मांडले.

12:38 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: मेलबर्नमधील हवामान कोरडे

टीम इंडियाच्या नशिबाने मेलबर्नमध्ये हवामान कोरडे आहे. दिवसभर कडक ऊन पडले होते. त्यामुळे गेले दोन दिवसांपासून पाऊस देखील झाला नाही. त्यामुळे पावसाचा त्रास भारताला होणार नाही.

12:03 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: टीम इंडिया मेलबर्न मधील एमसीजी मैदानात दाखल

भारतीय संघ आज झिम्बाब्वेशी दोन हात करणार आहे. सामन्यासाठी टीम इंडिया मेलबर्नमधील ऐतिहासिक एमसीजी मैदानात दाखल झाली आहे. सामन्याआधी वार्म-अप कर्णधार रोहित शर्मा आणि इतर खेळाडू

https://twitter.com/BCCI/status/1589141556413759494?s=20&t=bCHgcIfut-aHMpE5OKxZCA

11:56 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: टीम इंडिया अगोदरच उपांत्य फेरीत पोहचली

नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा धक्कादायकरित्या पराभव करत मोठा अपसेट केला. दक्षिण आफ्रिकेच्या या पराभवामुळे टीम इंडिया झिम्बाब्वेविरुद्धचा सामना खेळण्याआधीच उपांत्य फेरीत पोहचली असून हा सामना टीम इंडियासाठी केवळ औपचारिकता आहे. पण गटात अव्वलस्थान कायम राखण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आहे.

https://twitter.com/BCCI/status/1589097924243623939?t=TV8VMyKTc1NQEZpgy2x8Jg&s=08

11:51 (IST) 6 Nov 2022
INDvsZIM: टीम इंडिया आज झिम्बाब्वेशी करणार दोन हात

टी२० विश्वचषक २०२२ सुपर-१२ मधील शेवटचा सामना आज भारत वि. झिम्बाब्वे असा रंगणार आहे. टीम इंडिया अगोदरच उपांत्य फेरीत पोहचली असून गटातील अव्वल स्थान कायम राखण्यासाठी आजचा सामना जिंकण्याचा रोहित सेना प्रयत्न करणार आहे.

https://twitter.com/BCCI/status/1589127941212016640?t=VLn3myB0Ee-9GYY-WBULPA&s=08

India vs Zimbabwe Live Cricket Score

India vs Zimbabwe Highlights Match Updates in Marathi: भारत विरुद्ध झिम्बाब्वे हायलाइट्स अपडेटस