T20 World Cup Final PAK vs ENG Highlight: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड टी २० विश्वचषक अंतिम सामन्यात इंग्लंडने ५ गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला. या विजयासह इंग्लंड यंदाच्या टी २० विश्वचषक २०२२ चा चॅम्पियन ठरला आहे. पाकिस्तानने इंग्लंडला या सामन्यात कडवी झुंज देऊनही ऐन वेळी बेन स्टोक्सच्या अर्धशतकाने पाकिस्तानच्या हातचा विजय पळवून आणला आहे. या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी ट्विटरवर केवळ एक हार्ट ब्रेक झाल्याचा ईमोजी पोस्ट केला होता यावर भारतीय गोलंदाज मोहम्मद शमीने प्रत्युत्तर देऊन शोएब अख्तर यांना मोजक्याच शब्दांमध्ये सुनावले आहे.

टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा इंग्लंड कडून पराभव झाल्यांनतर शोएब अख्तर यांनी संघावर टीका केली होती, यावेळी त्यांनी मोहम्मद शमीला खेळवण्याचा निर्णयावर सुद्धा भाष्य केले होते. अख्तर म्हणाले होते की “ टीम इंडियाने अचानक शमीला संघात सामील केले, तो एक चांगला वेगवान गोलंदाज आहे, परंतु संघात येण्यास पात्र नाही”

“भारतासाठी उत्तम प्लेइंग इलेव्हन कोणती हे मी सांगू शकत नाही. मला वाटत नाही की भारताकडे फिरकी गोलंदाज उपलब्ध आहेत. शमी ऐवजी चहल चांगला खेळू शकला असता पण त्याला संघात समाविष्ट करण्यात आले नाही. आदिल रशीद खेळू शकतो तर चहल का नाही? असा प्रश्नही अख्तर यांनी केला होता.आज पाकिस्तानला याच इंग्लंडने धूळ चारली आहे, यानंतर शोएब अख्तर यांच्या ट्विटला उत्तर देत मोहम्मद शमीने ” सॉरी भाई, पण इट्स कर्मा” असे लिहिले आहे.

मोहम्मद शमीचा शोएब अख्तरला टोला

T20 World Cup Final: शाहीन आफ्रिदीने घेतलेली ‘ती’ विकेट पाकिस्तानला पडली भारी; इंग्लंडच विश्वविजेता!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आज पाकिस्तानचे गोलंदाज विरुद्ध इंग्लंडची तुफानी फटकेबाजी असा सामना पाहायला मिळाला होता. पाकिस्तानने दिलेले १३८ धावांचे लक्ष्य पूर्ण करताना सुरुवातीला इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणी आल्या. आफ्रिदीच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा धावांचा रथ थांबला होता मात्र मोक्याच्या वेळी हॅरी ब्रुक याची विकेट घेताना आफ्रिदीला दुखापत झाली व खेळाचा सूरच बदलला. आफ्रिदी खेळातून बाहेर पडताच पुन्हा बेन स्टोक्सने गती पकडून आपके अर्धशतक पूर्ण केले व संघाला विजय मिळवून दिला.