ऑस्ट्रेलियाचा बॅकअप यष्टिरक्षक जोश इंग्लिसच्या हाताला दुखापत झाल्याने, तो टी२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्यामुळे जखमी जोश इंग्लिसच्या जागी ऑस्ट्रेलियन संघात कॅमेरॉन ग्रीनचा समावेश करण्यात आला आहे. ग्रीन हा उत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. त्याला टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघात का स्थान देण्यात आले नाही, यावर सतत चर्चा होत होती.

बुधवारी सिडनीमध्ये गोल्फ खेळताना यजमान ऑस्ट्रेलियाचा बॅकअप यष्टिरक्षक इंग्लिसच्या हाताला दुखापत झाली आहे. ज्यामुळे अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनला त्याच्या जागी संधी मिळाली आहे. अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीनने नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यात आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले होते.

कॅमरॉन ग्रीनने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी १४ कसोटी, १२ एकदिवसीय आणि सात टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. सात टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ग्रीनने १९.४२ च्या सरासरीने आणि १७४.३५ च्या स्ट्राइक रेटने १३६ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. ग्रीनने पाच टी२० आंतरराष्ट्रीय विकेट्सही घेतल्या आहेत. तो मोठे फटके खेळण्यात पटाईत आहे.

हेही वाचा : ICC T20 Rankings: टी२० रँकिंग जाहीर! सूर्या-रिझवान आणि बाबर यांच्यात खरी चुरस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघ:
अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, अॅरॉन फिंच (कर्णधार), जोश हेझलवूड, कॅमरॉन ग्रीन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम झाम्पा.