ऑस्ट्रेलियातील आश्वासक प्रदर्शनानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताचा इंग्लंडविरुद्ध अॅडलेड ओव्हलवर झालेल्या उपांत्य फेरीत १० गडी राखून पराभव झाला. त्यानंतर या फॉर्मेटमधून कोणाला वगळले जाऊ शकते याकडे आता बोटे दाखवली जात असताना, माजी इंग्लिश फिरकीपटू माँटी पानेसरचे मत आहे की विराट कोहली अजूनही २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळू शकतो. कारण तो अत्यंत तंदुरुस्त आहे. पण त्याला वाटत नाही की, रोहित शर्मा दोन वर्षांनी होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होईल.

पनेसरने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, “विराट जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो सर्व भारतीय खेळाडूंमध्ये तंदुरुस्त आहे. विराटचा सुपर फिटनेस पाहता वय हा त्याच्यासाठी फक्त एक आकडा आहे. २०२४ च्या टी-२० विश्वचषकात तुम्ही त्याला पाहू शकता. मला रोहित त्या स्पर्धेचा भाग होताना दिसत नाही, डीके आणि अश्विन देखील (कदाचित तिथे नसतील). आणखी खेळाडू असू शकतात (टी-२० निवृत्तीचा विचार करून), परंतु मला वाटते, तिघेही टी-२० सोडून कसोटी आणि वनडेवर लक्ष केंद्रित करतील.”

उपांत्य फेरीत भारताची लढत झाली नसल्याचा दावा करत पानेसर यांनी हे एकतर्फी प्रकरण असल्याचे मान्य केले. तो म्हणाला, ‘खरं सांगायचं तर भारताने उपांत्य फेरीत एकही लढत दिली नाही. हे पूर्णपणे एकतर्फी प्रकरण होते. बटलर आणि हेल्ससमोर भारतीय गोलंदाजी असहाय्य दिसत होती. तुम्ही उपांत्य फेरीत खेळत आहात आणि तुम्हाला कठोर संघर्ष करण्याची गरज आहे. १६८ हा छोटा स्कोअर नाही.”

हेही वाचा – सर्फराज खान रुग्णालयात दाखल… विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यात तो पुढे खेळू शकेल की नाही? घ्या जाणून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पांढऱ्या चेंडूच्या मालिकेसाठी हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आता न्यूझीलंडला पोहोचला आहे. पहिला सामना १८ नोव्हेंबरपासून सुरू होईल. या सामन्यासाठी कोणता संघ निवडला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.