टी-२० विश्वचषक स्पर्धेमधील उपांत्य फेरीमध्ये इंग्लंडच्या संघाकडून भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर विराट कोहलीची बहीण भावना कोहली-धिंग्रा हिने भारतीय संघासंदर्भात एक आवाहन केलं आहे. संघाला जिंकवून देण्यासाठी आणि उपांत्य फेरीपर्यंतची मजल मारण्यात मोठा वाटा असलेल्या विराटवर भावनाने कौतुकाचा वर्षाव केला आहे. भावनाने इन्स्टाग्राम स्टोरीवरुन आपल्या भावाबद्दलचं हे भाष्य केलं आहे.

नक्की वाचा >> World Cup: भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी पत्रकाराने मर्यादा सोडली; मोदींचा Video शेअर करत म्हणाला, “पंतप्रधानांनी…”

भावनाने तिच्या इनस्टाग्राम स्टोरीमधून विराटचं कौतुक केलं आहे. “तू तुझी सर्वोत्तम कामगिरी तिथं केली. तुला एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली आणि तुला तुझी हरवलेली लय गवसली. तुझा फार अभिमान वाटतो,” असं भावनाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केलं आहे. या स्टोरीमध्ये विराटचा आकाशाकडे पाहणारा फोटो आणि बॅट हातात घेऊन उभा असलेला फोटोही दिसत आहे. या फोटोंखाली लिहिलेल्या ओळींमधून भावानाने आपल्या भावाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नक्की वाचा >> World Cup: भारत स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर शाहीद आफ्रिदी म्हणाला, “भारताकडे कोणतंही…”; अंतिम सामन्याचा केला उल्लेख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेवटच्या दोन ओळींमध्ये भावानाने भारतीय संघ हा आपल्यासाठी कुटुंबाप्रमाणे असल्याचं सूचित केलं आहे. भारतीय संघातील खेळाडूंच्या नातेवाईकांचं प्रातिनिधिक मत मांडताना भावनाने, “आपण अशावेळी (पराभूत झाल्यानंतर) संघाला अधिक पाठिंबा देतो कारण वाईट काळात आपणच आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे,” असं म्हटलं आहे. सर्वच भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सध्या संघाच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक असल्याचं भावानाला यामधून सूचित करायचं आहे.

नक्की वाचा >> Ind vs Eng: भारताचा दारुण पराभव! स्कोअरकार्ड पोस्ट करत शोएब अख्तर म्हणाला, “बिनबाद १७०… हा आकडा पुढील बराच काळ…”

अभिनेता अजय देवगण, फरहान अख्तर आणि अर्जून रामपालसारख्या सेलिब्रिटींनीही भारतीय संघाची पाठराखण केली आहे.