रविवारी (३० ऑक्टोबर) पर्थच्या मैदानावर झालेल्या टी-२० विश्वचषकाच्या २९व्या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँड्सचा ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यादरम्यान हारिस रौफचा धोकादायक बाऊन्सर नेदरलँड्सचा बॅट्समन बास डी लीडच्या हेल्मेटला लागला, त्यानंतर बॅट्समनला दुखापत होऊन मैदान सोडावे लागले. सामन्यानंतर हारिस रौफ बास डी लीडेला भेटताना दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हारिस रौफ आणि बास डी लीडे यांचा हा व्हिडिओ आयसीसीनेच त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हारिस सामना संपल्यानंतर जखमी फलंदाजाला विचारताना दिसत आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजाने नेदरलँड्सच्या फलंदाजाला मिठी मारली आणि त्यानंतर त्याला जोरदार पुनरागमनासाठी शुभेच्छा देताना कॅमेऱ्यात कैद झाला. तो म्हणाला, ‘मला आशा आहे की तू लवकर बरा होशील. तू लवकर पुनरागमन करावे आणि नंतर लांब षटकार मारावे.’

या सामन्यात स्टीफन मेबर्ग बाद झाल्यानंतर बेस डी लीडे फलंदाजीसाठी मैदानात आला होता, मात्र थोड्या वेळाने हारिस रौफ डावातील सहावे षटक टाकण्यासाठी आला. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने लेईडला बाउन्सर टाकला, ज्याचा फलंदाजाला अजिबात अंदाज घेता आला नाही आणि चेंडू थेट हेल्मेटला लागला. डोळ्याखालून रक्त बाहेर आले. त्यामुळे बास डी लीड वेदना होऊ लागल्या होत्या.

हेही वाचा – AUS vs IRE T20 World Cup 2022 : कर्णधार अ‍ॅरॉन फिंचच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचे आयर्लंडला १८० धावांचे लक्ष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेस डी लीड नेदरलँड संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आहे. लीडने या स्पर्धेत आतापर्यंत सहा सामन्यांत ८० धावा केल्या आहेत. गोलंदाजी करताना त्याने आपल्या संघासाठी ९ विकेट्स घेतल्या आहेत. हारिस रौफबद्दल बोलायचे तर या वेगवान गोलंदाजाने टूर्नामेंटमध्ये आतापर्यंत ३ सामन्यात ५.२७ च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करताना ४ बळी घेतले आहेत. नेदरलँड्सविरुद्धच्या गेल्या सामन्यात त्याने ३ षटकात फक्त १० धावा दिल्या होत्या.