ICC Test Rankings Announced : आयसीसी क्रमवारीत पुन्हा एकदा उलथापालथ झाली आहे. टीम इंडियाने शेवटच्या रँकिंगनंतर एकही सामना खेळला नसला, तरी पण यशस्वी जैस्वालला नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. जो रूट अजूनही कसोटीत रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असला तरी आता त्याला त्याच्याच जोडीदाराकडून आव्हान मिळताना दिसत आहे. दरम्यान, मोठी गोष्ट म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या टेम्बा बावुमाने टॉप-१० मध्ये प्रवेश केला आहे.

आयसीसीची कसोटी क्रमवारी जाहीर –

आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीत इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचे रेटिंग सध्या ८९५ आहे. गेल्या सामन्यात तो चांगला खेळू शकला नव्हता, त्यामुळे त्याचे रेटिंग घटले आहेत. दरम्यान, इंग्लंडचा हॅरी ब्रूक आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने दोन स्थानांची मोठी झेप घेतली आहे. आता त्याचे रेटिंग ८५४ झाले आहेत. याचा अर्थ असा की हॅरी आता जो रूटच्या जवळ येत आहे आणि येत्या काही आठवड्यांत जर त्याने त्याला मागे सोडले तर आश्चर्य वाटणार नाही. न्यूझीलंडचा माजी कर्णधार आजही पूर्वीप्रमाणेच तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचे रेटिंग पॉइंट ८३० आहेत.

novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
ajith kumar team won dubai car race 2
सरावादरम्यान क्रॅश झाली होती कार, तरीही जिंकली दुबईतील स्पर्धा; ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारवर कौतुकाचा होतोय वर्षाव
India Slip To Third Position in ICC test Team Rankings After Defeat in Australia Test and South Africa Whitewashed Pakistan
ICC Test Team Rankings: भारताला पाकिस्तानच्या पराभवाचा कसोटी क्रमवारीत धक्का, ऑस्ट्रेलियानंतर आफ्रिकेमुळे टीम इंडिया ‘या’ स्थानावर घसरली
Border-Gavaskar Trophy Test series Team India defeat australia jasprit bumrah virat kohli rohit sharma
विश्लेषण : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या पराभवास कारणीभूत ठरले हे सहा घटक…
IND v AUS Australia wins BGT 2025 after 10 years against India
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनी भारताला नमवत जिंकली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, WTC फायनलमध्ये मारली धडक
rishabh pant
कसोटी रंगतदार स्थितीत, बोलँडच्या भेदकतेला पंतचे आक्रमकतेने प्रत्युत्तर; भारताकडे आघाडी
IND vs AUS Virat Kohli did not hit a single four in his first tine 69 ball innings in Test cricket career in Sydney
IND vs AUS : विराट कोहलीचा लाजिरवाणा विक्रम! कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदाच असं घडलं

शतकानंतरही जैस्वाल-विराट बसला फटका –

गेल्या आठवड्यात दुसऱ्या स्थानावर पोहोचलेल्या भारताच्या यशस्वी जैस्वालची घसरण झाली आहे. त्याचे रेटिंग पॉइंट ८२५ इतकेच आहेत, जे आधी होते, परंतु आता तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हॅरी ब्रूकमुळे जैयस्वालचे नुकसान झाले आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याला मोठी खेळी खेळण्याची संधी मिळेल आणि तो पुन्हा त्याच स्थानावर विराजमान होईल. विराट कोहलीला बसला फटका ६८९ रेटिंग गुणांसह १४ व्या स्थानावर पोहोचला आहे.

हेही वाचा – Prithvi Shaw : ‘सोशल मीडियापासून दूर राहा, अन्…’, आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिलेल्या पृथ्वीला केव्हिन पीटरसनचा सल्ला

जसप्रीत बुमराहचे वर्चस्व कायम –

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा कायम आहे. बूम-बूम बुमराह हा जगातील नंबर वन कसोटी गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बुमराहची कामगिरी अप्रतिम होती. भारतीय वेगवान गोलंदाजाने पहिल्या डावात कहर केला आणि पाच विकेट्स घेतल्या. त्याचवेळी बुमराहने दुसऱ्या डावातही तीन विकेट घेतल्या. मार्को यान्सनला श्रीलंकेविरुद्धच्या त्याच्या शानदार गोलंदाजीचे बक्षीस मिळाले असून त्याने टॉप १० मध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर पॅट कमिन्सलाही एका स्थानाचा फायदा झाला आहे.

Story img Loader