Kamran Akmal bold prediction about Pakistan ahead Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि यूएईमध्ये खेळली जाणार आहे. या मेगा इव्हेंटसाठी क्रिकेट पंडितांनी त्यांचे भाकित मांडण्यास सुरुवात केली आहे. बहुतेक माजी क्रिकेटपटू भारत आणि पाकिस्तानचे नाव उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या संभाव्य संघांमध्ये घेत आहेत, परंतु एका माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूचा असा विश्वास आहे की त्यांचा संघ उपांत्य फेरीतही पोहोचू शकणार नाही, ट्रॉफी जिंकणे तर सोडाच.

पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलच्या मते पाकिस्तानचा संघ असा आहे की, ‘चल जाए तो चांद तक, वरना शाम तक’ अशी आहे. याशिवाय, जर त्यांचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला, तर तो ही एक मोठी कामगिरी मानेल असेही तो म्हणाला. कामरान अकमलने हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केले आहे.

कामरान अकमलचं पाकिस्तानबाबत मोठं वक्तव्य –

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना कामरान अकमल म्हणाला, “पाकिस्तान संघ असा आहे, चल जाए तो चांद तक, वरना शाम तक’. आमच्या संघात अनेक त्रुटी आहेत. गोलंदाजी संघर्ष करत आहे. फिरकी गोलंदाज नाहीत. सलामीवीर संघर्ष करत आहेत. निवडकर्त्यांनी आणि कर्णधाराने काय विचार केला हे मला माहित नाही. विशेष म्हणजे आमच्या चेअरमनने पण या संघला मान्यता दिली आहे. पाहूया परिस्थिती कशी पुढे जाते. पाकिस्तानशिवाय उर्वरित संघ बरेच संतुलित दिसत आहेत. त्यामुळे आम्हाला आणखी चांगल्या संघाची घोषणा करता आली असती. मला वाटतं भारत, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.”

कामरान अकमल पुढे म्हणाला, “पाच प्रमुख खेळाडूंना दुखापत झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ कमकुवत आहे. त्यामुळे अशा पाकिस्तान संघाची निवड करण्यामागे काय विचार आहे, हे मला माहित नाही. चेअरमन फारसे क्रिकेट खेळलेले नाही; कदाचित त्यामुळे त्यांना काही गोष्टी समजत नसतील. म्हणूनच त्यांनी अशा संघाला मान्यता दिली. भारत स्पष्टपणे प्रबळ दावेदार दिसत आहे; ते अंतिम सामना खेळण्यास पात्र आहेत. पण मी पाकिस्तानबद्दल असे म्हणू शकत नाही. जर ते उपांत्य फेरीत पोहोचले तर मी ते एक मोठे यश मानेन.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तान ३० वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आयसीसीच्या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. या देशात शेवटचा विश्वचषक १९९६ मध्ये खेळला गेला होता, तेव्हा विराट कोहली ८ वर्षांचा होता आणि बाबर आझम एक वर्षाचा होता.