Tilak Verma on Rohit Sharma’s daughter: भारताला मधल्या फळीत तिलक वर्माच्या रूपाने नवा स्टार मिळाला आहे. काहीजण या फलंदाजाची तुलना सुरेश रैनाशी तर काहीजण सौरव गांगुलीशी करत आहेत. तिलक वर्माची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो डावखुरा फलंदाज आहे आणि भारतीय संघ व्यवस्थापन बऱ्याच दिवसांपासून मधल्या फळीत डावखुरा फलंदाज शोधत होते.

तिलक याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही टी२० सामन्यांमध्ये शानदार खेळी केली. दोन्ही टी२० मध्ये तो टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. पहिल्या सामन्यात त्याने २२ चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ३९ धावा केल्या, तर दुसऱ्या टी२० सामन्यात त्याने ४१ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५१ धावा केल्या. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक होते.

भारताचे उर्वरित दोन्ही फलंदाज टी२० मध्ये धावांसाठी झगडताना दिसले, दुसरीकडे तिलक वर्माने संयम राखत शानदार शॉट्स खेळले आणि आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, दोन्ही टी२० सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या टी२० नंतर तिलक वर्माने सांगितले की, त्याचा आदर्श कोण आहे? आणि त्याने अर्धशतक कसे केले?

रोहित आणि रैना हे तिलकचे आदर्श आहेत

सामन्यानंतर तिलक म्हणाला, “रोहित भाई (शर्मा) एक सपोर्ट सिस्टम आहे आणि त्याने मला नेहमीच खेळाचा आनंद घेण्यास सांगितले आहे. तो मला कसे खेळायचे याचे नेहमी मार्गदर्शन करतो. लहानपणापासून माझे प्रेरणास्थान (सुरेश) रैना भाई आणि रोहित भाई आहेत. मी बराच वेळ रोहित भाईसोबत घालवत असतो. पहिल्या आयपीएलमध्येच तो म्हणाला होता की ‘तिलक हा सर्व फॉरमॅटचे खेळाडू आहेत’ आणि त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला.

हेही वाचा: WC 2023: टीम इंडियाच्या चाहत्यांमध्ये एकता नाही? मोहम्मद कैफचा गंभीर आरोप! म्हणाला, “आवडीचे खेळाडू वाटून घेण्यापेक्षा…”

तिलक वर्मा सामन्याबद्दल काय म्हणाले?

सामन्याबद्दल बोलताना तिलक वर्मा, “दुसऱ्या टी२० मध्ये विकेट संथ आणि दुप्पट होती. त्यामुळे सुरुवातीला आम्हाला वाटले की १५०-१६० ही चांगली धावसंख्या असेल, पण मला वाटते की आम्ही १० धावांनी कमी पडलो. वेस्ट इंडिजच्या विजयाचे श्रेय निकोलस पूरनला जाते, त्याने खरोखरच चांगली फलंदाजी केली. आम्हाला माहित होते की आम्हाला एक विकेट मिळाली असती तर आम्ही सामना वाचवू शकतो, विकेट मिळणे सोपी गोष्ट नव्हती. खेळपट्टी अगदीच संथ होती. वेस्ट इंडिजने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. त्यांनी स्लोअर बॉल्सचा चांगल्याप्रकारे वापर केला आणि हार्ड लेन्थ बॉल टाकला. तसेच वाऱ्याचा चांगला उपयोग करून घेतला. याचे संपूर्ण श्रेय वेस्टइंडीजच्या गोलंदाजांना जाते.”

समायराबद्दल तिलक काय म्हणाला?

तिलक वर्माने आपले पहिले अर्धशतक झळकावल्यानंतर रोहितची मुलगी समायरा हिला ते समर्पित केले. सामन्यानंतर तो म्हणाला, “ही खेळी रोहित भाईची मुलगी सॅमीला (समायरा) समर्पित केली होती. मी सॅमीच्या खूप जवळ आहे. मी तिला वचन दिले की मी जेव्हाही शतक किंवा अर्धशतक झळकावतो तेव्हा मी तिच्यासाठी सेलिब्रेट करेन.”

हेही वाचा: Rohit Sharma: विश्वचषक ट्रॉफी हातात घेत रोहित शर्माने इतर संघांना दिला इशारा; म्हणाला, “१२ वर्षांनंतर पुन्हा आलो आहोत…”

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोपे नाही- तिलक वर्मा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटबद्दल बोलताना तिलक म्हणाले, “आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोपे नाही. त्यात तुम्हाला टिकून राहायचे असेल तर चांगले खेळत राहावे लागेल. तुम्हाला मैदानावर, मैदानाबाहेर स्वत:ला शिस्त लावावी लागेल. तुमच्या कामाच्या पद्धतीत शिस्त असावी लागते. या सर्व गोष्टी तुम्ही नियमितपणे केल्यास तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. मी खेळलेले दोन आयपीएल हंगाम माझ्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट होते. तेथील कामगिरीमुळे मला भारतीय संघासाठी बोलावण्यात आले आणि मी त्याच कामगिरीने खेळत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

द्रविडबद्दल तिलक काय म्हणाला?

तिलक वर्माने भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडचाही आदर केला. तो म्हणाला, “अंडर-१९ वर्ल्ड कपपासून मी राहुल सरांशी बोलत आहे. राहुल सर नेहमी सांगतात की तुमच्या मूलभूत गोष्टींना चिकटून राहा आणि जास्तीत जास्त वेळ क्रीजवर घालवा. तो मला नेहमी ‘खेळ एन्जॉय’ करायला सांगतो.” उभय संघांमधला तिसरा टी२० सामना मंगळवारी गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.