अनेक अव्वल दर्जाच्या खेळाडूंचा सहभाग असलेली चॅम्पियन्स टेनिस लीग स्पर्धा भारतात १७ ते २६ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली जाणार आहे.
ही स्पर्धा सहा शहरांच्या फ्रँचाईजींमध्ये होणार आहे. या लीगमध्ये तेरा सामन्यांचा समावेश असेल. ही स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने होईल. स्पर्धेतील विजेत्या संघास एक कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल. या स्पर्धेतील संघांमध्ये पुरुष व महिला या दोन्ही गटांतील खेळाडूंचा समावेश असेल. त्यामध्ये भारताच्या अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सहभाग असणार आहे.