पुणे : आशियाई स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच शंभर पदके मिळवण्याची कामगिरी केली. भारताच्या या कामगिरीवर केंद्रीय शिक्षणमंत्री यांनी भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभावीपणे राबवलेल्या फिट इंडिया आणि खेलो इंडिया या मोहिमांमुळे भारताला शंभर पदके मिळवण्याची कामगिरी करता आली, असे प्रधान म्हणाले.

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या २९ व्या पदवीप्रदान कार्यक्रमानंतर प्रधान यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. चीनमध्ये आशियाई स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील भारताच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करून पहिल्यांदाच शंभर पदकांचा टप्पा गाठला.

हेही वाचा : गुणवत्तापूर्ण आर्थिक विकास हे देशापुढील आव्हान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे मत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रधान म्हणाले, की भारताच्या खेळाडूंनी केलेली कामगिरी फार मोठी आणि महत्त्वाची आहे. पहिल्यांदाच भारताने शंभर पदके मिळवली आहेत. आतापर्यंत सर्वाधिक सत्तर पदकेच मिळवली होती. आता खेळाडूंनी सर्वच खेळांमध्ये उत्तम कामगिरी करून पदके प्राप्त केली आहेत.