भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पहिला कसोटी सामना नागपुरात खेळला जात आहे. या सामन्यातील पहिला दिवस गुरुवारी पार पडला. पहिल्या दिवसावर टीम इंडियाचे वर्चस्व पाहिला मिळाले. त्याचबरोबर भारतासाठी एक चिंतेची बाब पुन्हा समोर आली. कारण उपकर्णधार केएल राहुलचा फ्लॉप शो कायम असून त्याच्यावर टीका होत आहे. अशात माजी फिरकीपटूने राहुलला महत्वाचा सल्ला दिला.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ १७७ धावांत आटोपल. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने जबाबदारीने खेळताना गोलंदाजांना सेट होऊ दिले नाही. त्याने झटपट अर्धशतकही झळकावले. रोहित ५६ धावा करून नाबाद राहिला. पण दुसरीकडे केएल राहुलने पूर्णपणे निराशा केली. त्याला उपकर्णधाराला साजेशी खेळी करता आली नाही. त्याला टॉड मर्फीने त्याला एकदम सोप्या पद्धतीन बाद केले. अशा पद्धतीने फॉर्मशी झगड असलेल्या राहुलला हरभजनने एक सल्ला दिला आहे.

आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर बोलताना हरभजन सिंग म्हणाला, “केएल राहुल निराश असेल. कारण तो जास्त वेळ घेत आहे. मला वाटतं की त्याने आक्रमक पध्दतीने फलंदाजी केली असती, तर तो अधिक धावा करू शकला असता. मला आशा आहे की जर त्याला दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली, तर तो त्याच्या आत्मविश्वासासाठी काही धावा करेल.”

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: केएल राहुलच्या संथ खेळीबद्दल आकाश चोप्राने व्यक्त केला संताप; प्रश्न उपस्थित करताना म्हणाला, ‘त्याला भीती आहे की…’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवस अखेर केएल राहुलने संथ सुरुवात केल्यानंतर त्याची विकेट गमावली. त्याने ७१ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने २० धावा केल्या. त्यानंतर दुसरा दिवसाचा खेळ सुरु झाला असून टीम इंडियाने ४५ षटकानंतर ३बाद १३५ धावा केल्या आहेत. आर आश्विन ६२ चेंडूत २३ धावांवर बाद झाला. तसेच पुजारादेखील आक्रमक खेळण्याच्या नादात ७ धावांवर बाद झाला. सध्या खेळपट्टीवर १२० चेंडूत ८१ धावांवर रोहित शर्मा खेळत आहे.