India vs Australia 2023 2nd ODI Match Updates: भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० ने आघाडी घेतली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना आज विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. आस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्याला दुपारी १:३० पासून सुरुवात झाली असून सर्वांच्या नजरा या पाच खेळाडूंवर असतील.

१.केएल राहुल –

मुंबई एकदिवसीय सामन्यात १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केएल राहुलने विजय मिळवून दिला होता. त्यामुळे सर्वांच्या नजरा पुन्हा एकदा केएल राहुलवर असतील, ज्याने नाबाद ४५ धावा करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना राहुलने आपली क्षमता सिद्ध केली आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला विशेष कामगिरी दाखवता आली नाही.

हेही वाचा – WPL 2023 RCBW vs GGW: आरसीबीचा सलग दुसरा विजय, गुजरातचा आठ गडी राखून पराभव; सोफी डिव्हाईनची वादळी खेळी

२.विराट कोहली –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीने पहिल्या एकदिवसीय सामन्यात शांत फलंदाजी केली होती. त्याने ९ चेंडूंचा सामना केला आणि अवघ्या ४ धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. उजव्या हाताचा गोलंदाज मिचेल स्टार्कच्या चेंडूवर कोहली एलबीडब्ल्यू झाला. आता दुसऱ्या वनडेत संघाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

३.कुलदीप यादव –

डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादववरही नजर असेल. विरोधी संघाविरुद्ध तो चमकदार कामगिरी करत आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात कुलदीपला काही विशेष कामगिरी करता आली नाही. कुलदीपने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आठ षटके टाकली, ६ च्या इकॉनॉमीवर ४८ धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. त्याने एक मेडन ओव्हरही टाकली. विशाखापट्टणम येथील स्टेडियममध्ये फिरकीपटूंना भरपूर मदत मिळत असल्याने संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्याकडून मोठ्या आशा आहेत.

४.मिचेल मार्श –

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मिचेल मार्शने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली होती. मिचेल स्टार्कने शानदार गोलंदाजी करत संघाला सांभाळले. त्याने १२४.६१ च्या स्ट्राईक रेटने ६५ चेंडूत १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ८१ धावा केल्या. रवींद्र जडेजाने त्याला मोहम्मद सिराजकडे झेलबाद करून आपला बळी बनवला. आता त्यांच्याविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय गोलंदाजांना सावधपणे गोलंदाजी करणे आवश्यक आहे.

हेही वाचा – IND vs AUS 2nd ODI: टीम इंडिया मालिका जिंकण्यास सज्ज; ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

५.अॅडम झाम्पा –

ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार गोलंदाज अॅडम झाम्पाची भारताविरुद्ध शानदार कामगिरी आहे. वनडे फॉरमॅटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला आहे. २०१७ पासून तो भारताविरुद्ध एकूण १७ सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने एकूण २७ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या फलंदाजांनी सावधपणे फलंदाजी करणे गरजेचे आहे. मात्र, भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात झाम्पा ना बॅटने अप्रतिम दाखवू शकला ना चेंडूने.