IND vs AUS 3rd Test Updates: टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात मोठी कामगिरी केली. आर अश्विनने भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू कपिल देव यांचा विक्रम मोडला. भारताच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने भारतासाठी शानदार गोलंदाजी केली.

आर अश्विनने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज पीटर हँड्सकॉम्बला श्रेयस अय्यरच्या हाती झेलबाद करताच, त्याने कपिल देवच्या विक्रमाशी बोरबरी केली होती. त्यानंतर त्याने यष्टिरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरीला एलबीडब्ल्यू आऊट करून त्याने कपिल देव यांना मागे टाकले. त्याचबरोबर भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे.

Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
Anant Radhika's Pre-Wedding Ceremony Updates in Marathi
MS Dhoni : माही साक्षीसह अनंत राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरला रवाना, VIDEO होतोय व्हायरल
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
Jan Nicol Loftie Eaton Breaks Kusal Malla's Record
VIDEO : नामिबियाच्या फलंदाजांने झळकावले सर्वात वेगवान शतक, नेपाळविरुद्ध पाडला चौकार-षटकारांचा पाऊस

रविचंद्रन आश्विनचा कारनामा –

अश्विन आता भारताचा तिसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. हरभजन सिंग आणि अनिल कुंबळे सध्या त्याच्या पुढे आहेत. अश्विनने आतापर्यंत ६८९ विकेट्स घेतल्या आहेत, तर हरभजन सिंगने ७०७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर अनिल कुंबळेच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९५३ विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. कपिल देवच्या नावावर ६८७ विकेट आहेत, ज्या त्यांनी ३५६ सामन्यात घेतल्या आहेत.

आर आश्विनच्या विकेट्स –

भारताचा अनुभवी ऑफस्पिनर आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ४६६ विकेट्स घेतल्या आहेत, तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्याकडे १५१ विकेट्स आहेत. त्याच वेळी, गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात दिसलेल्या रविचंद्रन अश्विनने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७२ विकेट घेतल्या आहेत. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या विकेट्सची संख्या ६८९ झाली आहे.

हेही वाचा – WPL 2023: महिला प्रीमियर लीग २०२३ पूर्वी गुजरात जायंट्स आणि मिताली राजने धरला ठेका, पाहा मजेदार VIDEO

सामन्याबद्दल बोलायचे, तर भारत आणि ऑस्टेलिया संघात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव ७६.३ षटकांत १९७ धावांवर आटोपला. ज्यामध्ये भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर उमेश यादव आणि आश्विनने प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलिया संघाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक ६० धावा केल्या. भारतीय गोलंदाजांनी केवळ ११ धावांत ६ विकेट्स घेत कांगारूंना सळो की पळो करून सोडले.

त्यानंतर आता भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. भारताने दुसऱ्या डावात ११ षटकानंतर १ बाद २४ धावा केल्या आहेत. कर्णधारर रोहित शर्मा ११ आणि चेतेश्वर पुजारा ४ धावांवर खेळत आहे. त्याचबरोबर शुबमन गिलला फिरकीपटू नॅथन लायनने ५ धावांवर पव्हेलियनमध्ये पाठवले आहे.