WTC 2023 Final India vs Australia:  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळला जात आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात २९६ धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियाकडे १७३ धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावून १२३ धावा केल्या. सामन्यात ऑसी संघ भक्कम स्थितीत असून अजिंक्य रहाणेच्या शानदार खेळीनंतरही भारतीय संघ पिछाडीवर आहे.

लंडनमधील ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चार गडी गमावून १२३ धावा केल्या आहेत. सध्या कॅमेरून ग्रीन सात आणि मार्नस लाबुशेन ४१ धावांवर नाबाद आहे. भारतीय संघ आता चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला लवकरात लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न करेल. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २९६ धावांवर आटोपला. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात १७३ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात १२३ धावांची भर घातल्याने ऑस्ट्रेलियन संघाची एकूण आघाडी आतापर्यंत २९६ धावांची झाली आहे.

AUS vs NZ 2nd T20I Highlights in marathi
AUS vs NZ : मॅक्सवेलने फिंचचा विक्रम मोडत रचला इतिहास, ऑस्ट्रेलियासाठी ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
England have named our XI for the fourth Test in RanchI
IND vs ENG : चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन जाहीर! वूड-अहमदच्या जागी ‘या’ दोन खेळाडूंना मिळाली संधी
India Vs England 3rd Test Rohit Sharma Video Viral
IND vs ENG : रोहित शर्माने बूट उचलला, अन् जैस्वाल-सर्फराझसह इंग्लंडचे खेळाडू फिरले माघारी, VIDEO व्हायरल

दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजा १३ धावा, डेव्हिड वॉर्नर एक धावा, स्टीव्ह स्मिथ ३४ धावा आणि ट्रॅव्हिस हेड १८ धावा करून बाद झाला. भारताकडून रवींद्र जडेजाने दोन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. जडेजाने मागील डावातील दोन्ही शतकवीर स्मिथ आणि हेड यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

सामन्यानंतर हरभजन काय म्हणाला?

फिरकीपटू हरभजन सिंग म्हणाला की, “कौशल्याची कमतरता नाहीये. जितके मोठे सामने खेळतील, तितके चांगले राहील. मला वाटते की, अशा सामन्यात मोकळेपणाने खेळण्याची गरज आहे. आपण खूपच बचावात्मक खेळत आहोत. आपल्याला निकालाची चिंता न करता खेळावे लागेल.” पुढे बोलताना तो म्हणाला की, “खेळाडूंवर जबाबदारी टाका आणि ते नक्कीच आपले काम पूर्ण करतील. त्यांच्यावर दबाव टाकला जावा जर ते चांगले खेळले नाहीत, तर काहीजण बाहेर होतील आणि काही नाही. यामुळे भारताला आधीक पर्याय उपलब्ध होतील.”

पॅट कमिन्सचे नो-बॉल

डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात कमिन्सने १६ षटके गोलंदाजी करताना 6 नो-बॉल टाकले आहेत. यामधील २ नो-बॉलमुळे ऑस्ट्रेलिया संघाचे मोठे नुकसान झाले. खरं तर, मागील काही वर्षांमध्ये कमिन्सने न थकता नो-बॉल टाकले आहेत. १ जानेवारी, २०२२नंतर त्याने २२ नो-बॉल टाकले आहेत. यात कॅमरून ग्रीन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने २६ नो-बॉल टाकले आहेत.

हेही वाचा: WTC 2023 Final: “अजिंक्य-शार्दुलची शानदार खेळी म्हणजे टॉप ऑर्डरला आरसा दाखवणारी…”, गांगुलीचा रोहित-विराटला अप्रत्यक्ष टोला

१ जानेवारी, २०२२नंतर सर्वाधिक नो-बॉल टाकणारे ऑस्ट्रेलियन गोलंदाज

२६- कॅमरून ग्रीन

२२- पॅट कमिन्स

४- मिचेल स्टार्क

२- स्कॉट बोलँड

०- नेथन लायन