भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे ‌‌बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या नावाने खेळल्या जाणाऱ्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. उभय संघातील दुसरा सामना शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर सुरू होईल. ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यातून मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, त्यांच्या पुढील आव्हान सोपे असणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाला येथेही आपली विजयी घोडदौड कायम ठेवायची आहे, जेणेकरून ते मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेऊन आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करू शकेल. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संघाच्या तयारीवर मीडियाशी संवाद साधला. येथे त्याला भारतीय संघात दर्जेदार डावखुरे वेगवान गोलंदाज नसल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की, “जर तुम्हाला ६ फूट ४ इंच डावखुरे वेगवान गोलंदाज माहित असतील तर आम्हाला कळवा.”

खरे तर या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने मुख्य प्रशिक्षकाला भारतीय संघात डावखुरे वेगवान गोलंदाज नसल्याबद्दल प्रश्न विचारला. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आणि पाकिस्तानचा उदयोन्मुख वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांची नावे घेत तो म्हणाला की असे गोलंदाज गोलंदाजीमध्ये एक विशेष प्रकार आणतात, जे फलंदाजांसाठी आव्हानात्मक असते.

हेही वाचा: IND-W vs WI-W T20 WC: भारताची विजयी घौडदौड सुरूच! वेस्ट इंडीजवर सहा विकेट्सने मात, दीप्ती ठरली विजयाची शिल्पकार

या पत्रकाराने आपल्या प्रश्नात आशिष नेहरा आणि इरफान पठाण या माजी डावखुऱ्या गोलंदाजांची नावे घेत भारताला असे वेगवान गोलंदाज सापडत नाहीत, असा प्रश्न केला. हा प्रश्न धीराने ऐकून द्रविडने उत्तर दिले की, “केवळ डावखुरा वेगवान गोलंदाज असल्याने कोणीही भारतीय संघात येऊ शकत नाही. त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्येही कामगिरी करावी लागते. त्यानंतरच त्याला टीम इंडियात संधी मिळू शकते.”

राहुल द्रविड म्हणाला, “डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज अनेक विविधता आणतो. तुम्ही झहीर खानचे नाव विसरलात. पण निवडकर्ते आणि व्यवस्थापन अशा प्रतिभांचा नक्कीच शोध घेत आहेत. अर्शदीप सिंगने अलीकडेच एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्याने रणजी ट्रॉफीचे सामनेही खेळले आहेत ज्यात त्याने ४-५ विकेट्स घेतल्या आहेत. तो तरुण आहे आणि हळूहळू आणखी प्रगल्भ होत जाईल.”

हेही वाचा: IND-W vs WI-W T20 WC: दीप्ती शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा! टी२० मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारी बनली पहिली गोलंदाज

मुख्य प्रशिक्षक पुढे म्हणाले, “इथे इतर मुले आहेत, जी चांगली कामगिरी करत आहेत. पण फक्त डावखुरा वेगवान गोलंदाज असल्याने तुम्हाला संघात स्थान मिळत नाही. तुम्हाला पण उत्तम प्रदर्शन करावे लागेल.” यादरम्यान या पत्रकाराने राहुल द्रविडला अडवले आणि सांगितले की या वेगवान गोलंदाजांनी आमच्या फलंदाजांना अनेकदा त्रास दिला आहे. यानंतर द्रविडनेही लगेच उत्तर दिले. तो म्हणाला, “तुमच्याकडे ६ फूट ४ इंच असलेले गोलंदाज असतील, तर तुम्ही मला सांगा. तुम्ही मिचेल स्टार्क आणि शाहीन शाह आफ्रिदीची नावे घेतली आहेत, पण भारतात ६ फूट ५ इंच असलेले आणि डावखुरे वेगवान खेळाडू आढळतात.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus if you have 6ft4 bowlers then tell us said to the media team india coach rahul dravid avw
First published on: 16-02-2023 at 10:49 IST