Jasprit Bumrah break Kapil Dev record in IND vs AUS Melbourne Test : यंदाचा ऑस्ट्रेलिया दौरा जसप्रीत बुमराहसाठी सर्वोत्तम ठरला आहे, ज्यामध्ये कांगारू संघाचे फलंदाज त्याच्या चेंडूंचा सामना करताना आतापर्यंतच्या संपूर्ण मालिकेत संघर्ष करताना दिसले आहेत. मेलबर्न स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात बुमराहने कांगारू संघाचा सलामीवीर सॅम कॉन्स्टासला त्रिफला उडवत इतिहास घडवला आहे. त्याने कपिल देवला मागे टाकत ऑस्ट्रेलियात मोठा पराक्रम नोंदवला आहे.

जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियात केला मोठा पराक्रम –

बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराहने त्याच्या आत येणाऱ्या चेंडूने सॅम कॉन्स्टासचा त्रिफळा उडवत ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. बुमराहच्या आधी हा विक्रम कपिल देवच्या नावावर होता, ज्यांनी १९९१-९२ मध्ये झालेल्या मालिकेत एकूण २५ विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहने या मालिकेत आतापर्यंत २६ विकेट्स घेतल्या असून त्यात आणखी वाढ होणार हे निश्चित आहे. याआधी २०१८-१९ मध्ये जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता, तेव्हा तो हा विक्रम मोडण्यापासून फक्त ५ विकेट दूर राहिला होता, पण यावेळी तो मोडण्यात यशस्वी ठरला.

ऑस्ट्रेलियात एका कसोटी मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय वेगवान गोलंदाज :

  • जसप्रीत बुमराह – आतापर्यंत २६ विकेट्स (२०२४-२५)
  • कपिल देव – २५ विकेट्स (१९९१-९२)
  • जसप्रीत बुमराह – २१ विकेट्स (२०१८-१९)
  • मनोज प्रभाकर – १९ विकेट्स (१९९१-९२)

हेही वाचा – IND vs AUS: जसप्रीत बुमराहने घडवला इतिहास, दिग्गजांना मागे टाकत ठरला जगातील नंबर वन गोलंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुमराहचा यंदाच्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये दबदबा –

जसप्रीत बुमराह यंदाच्या वर्षात आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे, ज्यामध्ये त्याने १३ सामन्यांमध्ये १५.३२ च्या सरासरीने ६७ विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर इंग्लंडच्या गस एटिन्सनचे नाव आहे, ज्याने यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये ५२ विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे आता हे निश्चित झाले आहे की बुमराह सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे.