scorecardresearch

IND vs AUS 3rd Test: शास्त्री गुरुजींचे दोन शब्द अन् मॅथ्यू हेडनची बोलती बंद, खेळपट्टीवरच्या लांबलचक भाषणाला दिले जबरदस्त उत्तर

IND vs AUS Indore Pitch: जेव्हा भारतीय डावात विकेट्स पडू लागल्या, तेव्हा मॅथ्यू हेडनने कॉमेंट्री दरम्यान खेळपट्टीवर खूप मोठे भाष्य केले. याला प्रत्युत्तर देताना माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दोन शब्दांत त्याची बोलती बंद केली.

IND vs AUS 3rd Test: Mathew Hayden's long on-field speech is interrupted by Ravi Shastri's two-word reply
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

IND vs AUS Indore Pitch: इंदोरच्या होळकर स्टेडियमवरील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी सुरुवातीच्या तासात जबरदस्त नाट्य पाहायला मिळाले कारण भारताने फलंदाजीचा निर्णय घेतल्यावर अवघ्या ४५ धावांत पाच विकेट्स गमावल्या होत्या. त्याचा पहिला डाव १०९ धावांवर आटोपला. भारतीय कर्णधार रोहित शर्माला मिचेल स्टार्कविरुद्धच्या सामन्याच्या सुरुवातीच्या षटकात दोन लाइफलाइन मिळाल्या कारण पंचाने त्याला आऊट दिले नाही आणि ऑस्ट्रेलियन संघानेही डीआरएस घेतला नाही. त्यावरून ऑस्ट्रेलियाचा माजी आक्रमक फलंदाज मॅथ्यू हेडनने कॉमेंट्री दरम्यान खेळपट्टीवर खूप मोठे भाष्य केले. याला प्रत्युत्तर देताना माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दोन शब्दांत त्याची बोलती बंद केली.

यानंतर विकेट्स पडण्याचा सिलसिला सुरूच राहिला आणि टीम इंडियाचा पहिला डाव १०९ धावांवर आटोपला. यादरम्यान कॉमेंट्री करत असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडनने खेळपट्टीवर जोरदार टीका केली. त्यावर रवी शास्त्रींनी त्यांना असे उत्तर दिले की त्यांची बोलतीच बंद केली. पहिल्या दिवशी कसोटी सामन्यातील सहावे षटक टाकण्यासाठी जगात कुठेही फिरकीपटू येणार नाही, असे म्हणत हॅडन जोरदारपणे खेळपट्टीवर प्रहार केला.

हेही वाचा: IND vs AUS 3rd Test: ख्वाजाचे शानदार अर्धशतक! इंदोर कसोटीत पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

हेडन म्हणाला की, “भारतीय तंबूत थोडी शांतता आहे. गेल्या दोन कसोटीत ते खूप यशस्वी झाले होते, पण इथे ते सरासरी खेळ दाखवत आहे. त्यामुळेच मला या परिस्थितींचा त्रास होतो, कारण जगात अशी कोणतीही जागा नाही जिथे फिरकी गोलंदाज सहाव्या षटकात गोलंदाजी करायला येऊ शकतील.” आपले बोलणे चालू ठेवत तो पुढे म्हणाला, “इथे इंदोरमध्ये सरासरी फिरकी ४.८ अंश इतकी आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर चेंडू वळण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. सामान्य कसोटीत तिसऱ्या दिवशी तुम्हाला अशा वळणाची अपेक्षा असते. तुम्हाला फलंदाजांना धावसंख्या उभारण्याची संधी द्यावी लागेल. रवी शास्त्री तुमच्या खेळाडूंच्या कसोटी सामन्यातील कामगिरीच्या आधारे त्यांचा न्याय करा. पहिला दिवस आणि दुसरा दिवस फलंदाजीसाठी असावा. हे माझे मत आहे.”

शास्त्रींनी याला दोन शब्दात उत्तर दिले आणि हेडनला गप्प केले, म्हणाले की “घरची परिस्थिती म्हणजेच होम कंडीशन्स मधील परिस्थिती अशीच असते.” काही वेळ शांत राहिल्यानंतर शास्त्री पुढे म्हणाले, “घरच्या परिस्थितीपेक्षा इथे वेगळी गोष्ट आहे, दोन्ही संघांच्या फलंदाजांसाठी अवघड जाणार आहे, एक चांगली भागीदारी इथे खूप मोठा फरक निर्माण करेल आणि तेच हार-विजय यातील अंतर असणार आहे.”

हेही वाचा: ICC Test Ranking: जेम्स अँडरसनचे कसोटी क्रिकेटमधील राज्य खालसा! अश्विन अण्णा ठरला टेस्टमध्ये नंबर १ गोलंदाज

भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया पहिल्या डावात १०९ धावांवर बाद झाली. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चार गड्यांच्या मोबदल्यात १५६ धावा केल्या आहेत. पहिल्या डावात कांगारू संघाने आतापर्यंत ४७ धावांची आघाडी घेतली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-03-2023 at 18:06 IST